शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

‘सुखाशी भांडतो आम्ही’ दर्जेदार सादरीकरण भूतकाळाचे वर्तमानात रूपांतर :

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

डॉक्टर दाम्पत्यही भानावर येते

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी सुख म्हणजे काय? ते मिळविण्यासाठी किंवा त्याच्या हव्यासापोटी माणूस सारखा पळत असतो. परंतु सुख वाळूसारखं असतं. मूठ कितीही घट्ट आवळली तरी मुठीतील वाळू ही हळूहळू निसटून जाते, त्याप्रमाणे हे सुख असते. याचे प्रत्यंत्तर शेवटी येते. एका डॉक्टरला स्वत:चा भूतकाळ जेव्हा मुलाच्या स्वरूपाने वर्तमानात उभा ठाकतो तेव्हा तो हतबल होतो. उपचारासाठी आलेला रूग्ण डॉक्टरला त्याचा भूतकाळ आठवण्यास सांगतो. अखेर सुखाच्या शोधार्थ असलेले डॉक्टर दाम्पत्य भानावर येते. सुखाशी भांडणाऱ्या कुटुंबाची कथा लेखक अभिराम भडकमकर यांनी ‘सुखाशी भांडतो आम्ही’ नाटकातून मांडली आहे. साई कला क्रीडा मंच, सिंधुदुर्गच्या कलाकारांनी त्याचे उत्कृष्टरित्या केलेले सादरीकरण प्रेक्षकांनाही भावले. नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा सर्व बाबतीत नाटक उत्कृष्ट ठरले. सामान्य माणूसदेखील सुखाच्या शोधार्थ भटकत असतो. पिंपळगावसारख्या खेड्यातून स्वत:चे भविष्य घडविण्यासाठी आलेला डॉक्टर श्रीधर (दिलीप राणे) मुंबई शहरात स्थायिक होतो. पत्नी मीता (अस्मिता खटखटे) व मुलगा अक्षय (चतुर पार्सेकर) यांच्या समवेत सुखासीन आयुष्य जगत असतो. बालउद्यानाच्या जागेत स्वत:चे अद्ययावत रूग्णालय उभारण्याचा त्याचा ध्यास असतो. त्याच दरम्यान सदाशिव नाशिककर (केदार देसाई) हा मनोरूग्ण डॉ. श्रीधर यांच्याकडे उपचारासाठी येतो. पेशाने शिक्षक असलेला सदाशिव मनाला मारताना स्वत:ची पत्नी व मुलाचा खून करतो. पुस्तकातलं तत्वज्ञान पुस्तकातच ठेवायच असतं, हे न उमगल्याने सदाशिवचे आयुष्य दुभंगतं. व्यावहारिक जगाशी जुळवून घेणं न जमल्याने सदाशिव आपली अशी अवस्था झाल्याचे सांगताना कबूल करतो. डॉक्टरला त्याचे बोलणे फार भावते. बोलण्याच्या ओघात डॉक्टर पत्नीला क्लब, लाईफमध्ये अधिक इंटरेस्ट असल्याने आपण लाईफ पार्टनर कमी व प्रोजेक्ट पार्टनर अधिक असल्याचे सांगतो. सदाशिव बरोबर बोलताना डॉक्टरलासुध्दा अंतर्मनाचा आवाज ऐकू येऊ लागतो. आपल्या हातूनही चूक झाल्याचे तो कबूल करतो. गावाकडे असलेल्या आईला शहरात आणण्याचा विचार पत्नीपुढे ठेवतो. त्यावेळी आपल्या माणसाबरोबर राहण्याचे आता दिवस राहिले नसल्याचे मीता सांगते. परंतु उच्चशिक्षण व कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी आईच्या शिफारशीने अमेरिकेला निघालेल्या अक्षयला जेव्हा आई अडवते तेव्हा हेच वाक्य आपल्या आईला ऐकवतो. डॉक्टर मात्र स्वत:चा भूतकाळ आठवत सर्व तरूणांची भाषा एकच असल्याचे मत व्यक्त करतात. अखेर सुखरूपी मृगजळाच्या मागे धावणारी मीता भानावर येते. अमेरिकेला निघालेल्या मुलाला अडवताना गर्भपात करून अन्याय केल्याचा तिला पश्चाताप होतो. डॉक्टरांमध्ये परिवर्तन होते. पत्नीला समजावताना सुखाच्या व्याख्या बदलण्याची भाषा करतात. ओरबाडून सुख मिळवण्यापेक्षा वाटून सुख मिळविण्याचे सांगतात. डॉक्टर अद्ययावत रूग्णालय उभारण्याचा निर्णय बदलून बालोद्यान उभारण्याचा निर्णय घेतात. लोकार्पण करताना बालोद्यानाचे नामकरण ‘सदाशिव नाशिककर बालोद्यान’ करतात. नाटकाचा विषय साधाच, सुख मिळविण्यासाठी धावणाऱ्या कुटुंबाचे चित्रण करण्यात आले आहे. दिग्दर्शक केदार देसाई यांनी आवश्यक तेथे वापरलेल्या संगीतामुळे नाटक अखेरपर्यंत बांधून ठेवण्यात यश मिळविले. कमलाबाई या पात्रातून कष्टकरी महिलेची व्यथा पुढे आली. प्रधान मॅडम या पात्राव्दारेही सुखासीन महिला आजारांचे चोचले कसे पुरवितात, याकडे लक्ष वेधले गेले. रंगमंचाचा पुरेपूर वापर करीत डॉक्टरांचे सुंदर घर व शेजारीच असलेला दवाखाना उभारण्यात आला. प्रत्येकाच्या सुखाच्या वाटा वेगळ्या असतात. काहीजण हवी ती किंमत देऊन सुख मिळवितात, तर काही मिळेल त्यात समाधान व्यक्त करतात. दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरी ध्येय मात्र एकच आहे. हेच या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. ‘सुख उगवण्यासाठी सुख पेरावं लागतं’ हा नाटकातून मिळणारा संदेश नक्कीच उपयुक्त आहे. नाटकामध्ये डॉक्टर श्रीधर व मीता आपल्या मुलावर अन्याय होऊ नये, यासाठी दुसऱ्या मुलांबाबत गर्भपाताचा निर्णय घेतात. यासाठी दिग्दर्शकांनी वापरलेली फ्लॅशबॅक संकल्पना उत्कृष्ट ठरली. श्रीमंत आईची भूमिका वठविण्यात अस्मिता खटखटे यशस्वी ठरल्या. व्यावहारिक जगाशी जुळवून घेताना होणारी दमछाक डॉक्टरांनी उत्कृष्ट मांडली. देवालाही प्रसंगी आपली तत्व गुंडाळावी लागली. परंतु डॉक्टरांचा संदेश दैनंदिन जीवन जगताना उपयुक्त ठरतो. कलाकारांनी आपल्या भूमिका सादर करताना घेतलेली मेहनत दिसून आली. प्रत्येक बाबतीत नाटकाचे सादरीकरण यशस्वी ठरले आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील या नाटकाने अन्य संस्थांपुढे आव्हान उभे केले आहे. आज सादर होणारे नाटक ‘काळोख देत हुंकार’ सादरकर्ते : नेहरू युवा आॅल मुव्ह आॅर्गनायझेशन