शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

भरघोस वेतनवाढीबद्दल एसटी कामगार सेनेचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 4:00 PM

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनी एसटी कामगारांना महामंडळाने वेतनवाढीची भेट देऊ केली आहे.

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनी एसटी कामगारांना महामंडळाने वेतनवाढीची भेट देऊ केली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय कार्यशाळेसमोर जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करून वाद्यवृंदाच्या तालावर नाचून आनंद व्यक्त केला.कामगारासांठी २०१६-२०२० साठी ४.८४९ कोटी रुपयांची भरघोस वेतनवाढ केली आहे. एसटीच्या एक लाख पाच हजार ६७९ कर्मचाऱ्यांना ३२ ते ४८ टक्क्यांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. नियमित वेतश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात किमान ४,६१९ रुपये ते कमाल १२,०७१ रुपये इतकी वाढ होणार आहे. पूर्वी पाच वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना ४ वेतनवाढ व तीन वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना २ वेतनवाढ, या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता किमान ४,६१९ ते कमाल ९,१०५ रुपये वाढ होणार आहे. १ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१८ या कर्मचाऱ्यांच्या २६ महिन्यांच्या थकबाकीची रक्कम १,१९७ कोटी रुपये ४८ समान हप्त्यांमध्ये अदा करण्यात येणार आहे.कर्मचाऱ्यांच्या पूरक भत्त्यांमध्येही वार्षिक ४५ कोटीवरून तब्बल २५० कोटींपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वेतननिश्चितीनंतर जुलै २०१८पासून वेतनवाढ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रतिमहिना ७५० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांना महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनेंतर्गत बिनव्याजी अग्रीम रक्कम देण्यात येणार आहे. वेतनवाढीचे एसटी कामगार सेनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे विभागीय कोषाध्यक्ष संतोष शेट्ये, राज्य कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, सचिन वायंगणकर, बाबा पाडाळकर, मंगेश देसाई, शैलेश देसाई, शैलेंद्र सुर्वे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी