पूजा निकम यांना सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:37+5:302021-04-24T04:31:37+5:30

सावर्डे : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ ॲण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्याकडून विशेष सामाजिक गौरव पुरस्कार चिपळूण ...

Social Pride Award announced to Pooja Nikam | पूजा निकम यांना सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर

पूजा निकम यांना सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर

सावर्डे : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ ॲण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्याकडून विशेष सामाजिक गौरव पुरस्कार चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा शेखर निकम यांना जाहीर झालेला आहे. या आंतरराज्य सामाजिक गौरव पुरस्काराचे वितरण ३१ मे रोजी बेळगाव येथे होणार आहे.

पूजा निकम यांनी सभापती काळात सर्व शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून कृषी, शिक्षण, घरकुल, आरोग्य, पर्यावरण संवर्धन इत्यादी क्षेत्रात यशस्वीपणे कामगिरी पार पाडली होती. शासनाच्या सर्व योजनांची तळागाळापर्यंत माहिती मिळावी व सर्वसामान्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून ग्रामपंचायत सदस्य व प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले होते. जलसंधारणासाठी नदी, नाले व ओव्हळ यांच्यावरती विविध सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्था व महिलांच्या योगदानातून बंधारे बांधून पाणी आडवा पाणी जिरवा, या शासकीय योजनेची अंमलबजावणी केली आहे. हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, चिपळूण पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Social Pride Award announced to Pooja Nikam