शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांना एकच लस

By admin | Updated: November 5, 2015 00:10 IST

आरोग्य विभाग : पाच प्रकारच्या आजारांवर उपाय

रत्नागिरी : बालवयात होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण ही सर्वात प्रभावी पद्धत ठरली आहे. मात्र आता यावर उपाय म्हणून ‘पेंटावॅलेंट’ नावाची लस उपलब्ध झाली असून चार लसींऐवजी ही एकच लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालकांचे श्रम आता वाचणार आहेत.सध्या शासनाने नवीन लस निर्माण केली असून, यापूर्वी लहान वयात होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी चार वेगवेगळ्या प्रकारची लस देण्यात येत होती. परंतु, सध्या ५ रोगांवर मात करणारी एकच नवीन लस ‘पेंटावॅलेंट’ नावाने उपलब्ध झाली आहे. ही लस १४ नोव्हेंबरनंतर राज्यामध्ये प्रत्येक बालकास दिली जाणार आहे. या पेंटावॅलेंट लसीमध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटीस - बी आणि हिमोफिलस इन्प्ल्युएन्झा टाईप - बी या ५ आजारांचा प्रतिबंध करणाऱ्या लसींचा समावेश करण्यात आला आहे. ही लस सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत मिळणार आहे. खासगी रुग्णालयात घ्यावयाची झाल्यास ही लस अंदाजे १२०० रुपयांत उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.जिल्ह््यातील जवळपास ९० हजार बालकांना या लसीचा लाभ मिळणार आहे. आत्तापर्यंत घटसर्प, डांग्या खोकला, हेपिटायटीस - बी अशा चार लसींचा समावेश असलेली दोन प्रकारची इंजेक्शन एकावेळी दिली जात होती.बालकाच्या जन्माच्या पहिल्या दीड महिन्यात एक, अडीच महिने आणि नंतर साडेतीन महिन्याच्या कालावधीत अशी प्रत्येकी दोन इंजेक्शन देण्यात येत होती. त्यामुळे एक वर्षाच्या आतील बालकाला हे डोस देण्यासाठी सहावेळा इंजेक्शनची सुई टोचावी लागत होती. परंतु, नवीन लस निर्मितीमुळे वारंवार सुई टोचावी लागणार नाही.लसीकरण वापराबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)पेंटावॅलेंट : यापूर्वी होत्या चार लसीलस १४ नोव्हेंबरनंतर बालकास दिली जाणार.पेंटावॅलेंट लसीमध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटीस - बी आणि हिमोफिलस इन्प्ल्युएन्झा टाईप - बी या ५ आजारांचा प्रतिबंध करणाऱ्या लसींचा समावेश.लाभ घ्यावाजनतेने ही नवीन लस उपलब्ध होताच त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.