शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

किनारा सुरक्षेवर भर

By admin | Updated: October 18, 2015 00:20 IST

पोलीस सज्ज : बुरडेंचे सहकार्याचे आव्हान

चिपळूण : मुंबईत झालेला बॉम्बस्फोट व २६/११ ला झालेला अतिरेकी हल्ला हा सागरी किनारी भागातून झाला. त्याची दखल घेऊन शासनाने कठोर पावले उचलली आहेत. शासन स्तरावर योग्य ती अंमलबजावणी सुरू आहे. किनारा सुरक्षेवर विशेष भर दिल्याची माहिती कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी केले. ते चिपळूण पोलीस ठाण्यात स्वागत कक्षाच्या प्रारंभासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण जे जे काम करतो, त्या कामाची त्या माणसाला अधिक माहिती असते. त्याच्या व पोलिसांच्या संबंधांवर अधिक माहिती मिळत असते. सागरी सुरक्षा दलही आमच्या मदतीला आहे. त्यांच्यातर्फे बीट हवालदारांशी संपर्क येतो व माहिती मिळते, असे त्यांनी सांगितले. सुरक्षेबाबत जाखडी नृत्याच्या माध्यमातून किनारपट्टी भागात प्रबोधनाचा प्रयोग झाला आहे. इतर तांत्रिक अडचणींबाबत शासन योग्य ती दखल घेत आहे. सततची गस्त व प्रत्येक जिल्ह्यासाठी बोटींना लावण्यात येणारा रंग यांचा विचार करून किनारपट्टी भागात झाडाझडती सुरू असते. किनारपट्टी भागात बसविलेले रडार बोटींचा रंग बघितल्यावर त्याची माहिती देते व त्यानंतर चौकशी सुरू होते. किनारपट्टी भागात चांगले काम सुरू आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सागरी पोलीस ठाण्यात कोस्टल मार्शल बीट संकल्पना राबविली आहे. दोन रायफलधारी पोलीस कर्मचारी दुचाकीने गस्त घालीत असतात. आरएफआयडीचा उपयोगही चांगल्या प्रकारे होत आहे. मार्शल बीट तेथे पोहोचून स्पर्श केल्याशिवाय ते अ‍ॅक्टिव्हेट होत नाही. यामुळे रोज जावेच लागते. सागरी सुरक्षेबाबत उपग्रहाद्वारे व प्रत्यक्ष लक्ष ठेवून आहोत; परंतु यासाठी किनारपट्टी भागातील तरुण, मच्छिमारांचे सहकार्य हवे.