शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या प्रश्नांवर शिवसेना निरूत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST

लांजा : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जातीवाचक वाड्यांची नावे बदलण्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या आदेशासंदर्भात बुधवारी विशेष सभेत विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला ...

लांजा

: नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जातीवाचक वाड्यांची नावे बदलण्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या आदेशासंदर्भात बुधवारी विशेष सभेत विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच अडचणीत आणले. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला सत्ताधारी शिवसेनेला उत्तरे देता आली नाहीत. यासंदर्भात पुढील कार्यवाही प्रशासन करेल, असे सांगून नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी ही सभा गुंडाळल्याची माहिती भाजप गटनेते संजय यादव यांनी दिली.

नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वाड्या, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यासंदर्भातील आदेश शासनाने काढला आहे. मात्र, संबंधित वाड्यांची नावे बदलण्यास लांजा शहर भाजपने तीव्र विरोध केला आहे.

या पार्श्वभूमीवर या विषयावर लांजा नगरपंचायतीची विशेष सभा बुधवारी (दि. ८) झाली. या ऑनलाईन सभेत सुरुवातीलाच भाजपच्या नगरसेवकांनी सदरहू वाड्यांची नावे बदलण्यासंदर्भात आपण कोणत्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे? कोणते पत्र संबंधित लोकांना दिले आहेत? लोकांची याबाबत चर्चा केली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर नगराध्यक्षांनी मौन बाळगले.

ज्या वाड्यांची नावे बदलण्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे, त्या वाड्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली. मात्र, त्याबाबतही सत्ताधारी शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारे उत्तर दिले गेले नाही. नगरपंचायत प्रभाग क्रमांक एकमधील कुक्कुटपालन, सुतारवाडी या वाड्यांचे नामकरण साईनगर करण्यात यावे, अशा संदर्भातील येथील नगरसेवक राजू हळदणकर यांच्या सहीचे पत्र दिवसभर व्हाॅट्सॲपवर फिरत होते.

यासंदर्भात येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांबाबत नाराजी व्यक्त केली. आम्हाला यासंदर्भात कोणत्याही प्रकारे माहिती दिली गेली नाही, असा आक्षेप घेत त्यांनी नामांतरास आमचा तीव्र विरोध असल्याचे पत्र विरोधी पक्षांना सादर केले. याचाही जाब भाजपच्या नगरसेवकांनी बैठकीत विचारला. मात्र, यावरही त्यांना कोणतेही उत्तरे समर्पक उत्तर देता आले नाही.

या विषयावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडून भाजपचे गटनेते संजय यादव यांनी वाड्यांची नावे बदलासंदर्भात तुमची नेमकी भूमिका स्पष्ट करा, असे सांगितले. मात्र, नगराध्यक्ष मनोहर बाईत त्यांनी हा विषय यापुढे प्रशासन हाताळेल, असे सांगून चेंडू प्रशासनाच्या कोर्टात टाकला.