शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
6
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
7
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
8
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
9
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
10
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
11
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
12
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
13
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
14
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
15
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
16
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
17
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
18
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
19
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
20
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक : कॉँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 13:03 IST

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यातील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण राबविण्याच्या बाजूने स्थानिक कॉँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे, तर राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दाखल केलेल्या मिलिंद कीर यांना पाठिंबा देण्याबाबत कॉँग्रेसमधील दुसरा गट सक्रिय आहे. परिणामी कॉँग्रेसमध्ये निर्माण झालेली गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार का, या चर्चेला आता उधाण आले आहे.

ठळक मुद्देकॉँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर?पदमुक्तीसह पाठिंब्यावरून मतभेद

रत्नागिरी : रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यातील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण राबविण्याच्या बाजूने स्थानिक कॉँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे, तर राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दाखल केलेल्या मिलिंद कीर यांना पाठिंबा देण्याबाबत कॉँग्रेसमधील दुसरा गट सक्रिय आहे. परिणामी कॉँग्रेसमध्ये निर्माण झालेली गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार का, या चर्चेला आता उधाण आले आहे.

रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदावरून शिवसेनेचे राहुल पंडित यांनी सहा महिन्यांपूर्वीच राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. पद रिक्त असलेल्या काळात शिवसेनेचे तालुकाप्रमुख नगरसेवक बंड्या साळवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. आता येत्या २९ डिसेंबरला थेट नगराध्यक्ष निवडणूक होत आहे.

या निवडणुकीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख व प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप प्रताप तथा बंड्या साळवी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर व भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मनसेचे रूपेश सावंत व अपक्ष मुकुंद जोशी हेसुध्दा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीतर्फे अर्ज भरण्याऐवजी मिलिंद कीर हे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना शहर विकास आघाडीतील राष्ट्रीय कॉँग्रेस, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी व अन्य घटक पक्षांचा पाठिंबा राहणार आहे.

कॉँग्रेसने या निवडणुकीत प्रथम आघाडीपासून अलिप्तता दाखवित स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर स्वतंत्र उमेदवार उभा करण्यास कॉँग्रेसमधील एका गटाने विरोध केला. हा गट महाविकास आघाडीच्या दिशेने जात शिवसेनेकडे झुकत असल्याचे दिसताच जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांना काँग्रेस पाठिंबा देत असल्याचे पत्रच दिले आहे.

१७ ची बैठक महत्त्वाची

राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर कॉँग्रेसने पुन्हा भूमिका बदलली आहे. राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावी किंवा नाही, याबाबतचा निर्णय लांजा नगर पंचायत निवडणुकीत आघाडी करण्याबाबतच्या निर्णयावर अवलंबून आहे. १७ डिसेंबरला कॉँग्रेस व राष्ट्रवादीची या विषयावर संयुक्त बैठक होणार असून, त्यावेळी रत्नागिरीत राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायचा की नाही, हे ठरणार आहे.

या सर्व राजकीय घडामोडींचा आढावा घेता कॉँग्रेसमधील गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका गटाचे सहकार्य शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी यांना मिळण्याची शक्यता आहे. परिणामी कॉँग्रेसमधील ही गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी