शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात शतायू ग्रंथालय अधिवेशन

By admin | Updated: January 6, 2015 21:52 IST

सुवर्ण महोत्सवी वर्ष : तीन दिवस भरगच्च कार्यक्रम, लोकसभा अध्यक्षांची उपस्थिती

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिर स्थापनेचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना वाचनालयातर्फे दि. ९ ते ११ जानेवारी या कालावधीत शतायु ग्रंथालये व ग्रंथकार अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अण्णासाहेब खेडेकर स्टेडियममध्ये रंगणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन दि. ९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षपद ८८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदांनद मोरे भूषविणार आहेत. उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री अनंत गीते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्षा सावित्री होमकळस उपस्थित राहणार आहेत. शनिवार, दि. १० रोजी सकाळी ९.३० वाजता प्रा. मिलिंद जोशी हे प्रा. सदानंद मोरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११.३० वाजता बाबा परीट यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिराव फडतरे, श्रीराम दुर्गे, हिंमत पाटील, रवींद्र कोकरे यांचे कथाकथन, दुपारी शतकोत्तर ग्रंथालयाची वाटचाल व समस्या या विषयावर चर्चासत्र, सायंकाळी ४ वाजता कवी संमेलन होईल. कवी संमेलनाचे अध्यक्ष नितीन तेंडुलकर असतील. त्यात कैलास गांधी, राजेंद्र आरेकर, रश्मी कशेळकर, राष्ट्रपाल सावंत, सचिन चव्हाण, ईश्वरचंद्र हलगरे, मंगेश मोरे, ज्ञानेश्वर झगडे, सुनील कदम, यशवंत कदम, प्रा. संतोष गोणबरे सहभागी होणार आहेत. सायंकाळी डॉ. रेखा देशपांडे लेखिका उमा कुलकर्णी यांची मुलाखत घेतील. रात्री ९ वाजता राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरी वादन होईल. यामध्ये कवीवर्य बंडा जोशी, अनिल दीक्षित, संदीप आरवट सहभागी होणार आहेत. सकाळी ११.३० वाजता साहित्य समाज व उदासीनता या विषयावर परिसंवादात मोनिका गजेंद्र गडकर अध्यक्षा, डॉ. सागर देशपांडे, डॉ.प्रदिप कर्णिक, रवींद्र घाटपांडे, अरुण जाखडे सहभागी होणार आहेत. सायंकाळी सौमित्र पाटील व आसावरी जोशी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांची मुलाखत घेणार आहेत. कादंबरीकार डॉ. तानाजी चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारोप समारंभाला मकरंद अनासपुरे, डॉ. सागर देशपांडे, नगराध्यक्षा सावित्री होमकळस उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन लोटिस्माचे अध्यक्ष अरविंद जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह प्रकाश काणे, धनंजय चितळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)