शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कलाकार निमकर ठरले शापीत गंधर्व

By admin | Updated: September 15, 2014 23:22 IST

तीन दशकांची सेवा: शासन दरबारी दखल नाही

रत्नागिरी : गेली तीन दशके चिपळूणच्या सांस्कृतिक क्षेत्रात कलाकार या नात्याने स्वतंत्र भूमिका निभावणारे गायक चंद्रकांत निमकर हे कलाकार मानधनापासून वंचित आहेत. संगीत क्षेत्रात कामगिरी करणारे निमकर हे शासन दरबारी मात्र शापीत गंधर्व ठरले आहेत. कोकण साहित्यिकांची खाण, चिपळूण हे संगीत रंगभूमीवरील दिग्गज कलावंत असलेले ठिकाण आहे. नाट्यपंढरी म्हणून या भूमीला अनेकांनी पसंती दिली आहे. याचाच परिपाक म्हणून दिल्ली दरबारी संगीत रंगभूमीवर कलाकारांचे सादरीकरण करण्याची संधी या ठिकाणी लाभली. कलाकार घडवण्याचे श्रेय काही कलाकारांना जाते. त्यापैकीच निमकर हे एक ज्येष्ठ कलावंत गायक आहेत. १९८५ पासून काल-परवापर्यंत निमकरांनी संगीत रंगभूमीची सेवा केली. वयाच्या पन्नाशीत निमकर यांनी ख्यालवर ताबा घेतला. पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गाण्याचा प्रभाव निमकर यांच्या गाण्यावर सतत राहिला. छोटा गंधर्वांच्या साऱ्या नाट्यगीतांची तहान निमकर यांच्या गाण्यातून भागवली जायची.चिपळूणची भूमी कलाकारांना सम्मान देणारी आहे. राम मंदिरात होणारी संगीत नाटके, उत्सवप्रसंगी सादर होणारी संगीतरजनी व स्वत:च्या तुटपुंज्या साहित्यासह दोन जिल्हे हिंडण्याची त्यांनी साधलेली किमया या गोष्टीवर निमकर हे लोकप्रिय ठरले. मात्र, अशा कलाकाराची दखल शासनाच्या कलाकार मानधन योजनेत घेतली गेली नाही.अपार कष्ट करून घरातील कुटुंबाची जबाबदारी एकट्याने पेलली. अशा परिस्थितीत बुवांनी संगीतसाधना केली. तानपुरा, संवादिनी मिळेल त्या साधनांसह केलेली संगीतासेवा या सर्व गोष्टींवर आजही निमकर हे तरुण संगीतकारांना मार्गदर्शक ठरत आहेत. मात्र, शासनदरबारी हा कलाकार शापीत गंधर्व ठरला आहे. दरवर्षी कलाकार मानधन योजनेसाठी विविध कलाकाराकडून प्रस्ताव मागवले जातात पण कधी तरी या ज्येष्ठ कलावंताकडे शासन पायधूळ ढाडणार काय असा सवाल करीत निमकर यांच्यासारखे या क्षेत्रात योगदान दिलेले कलाकार मात्र वंचित राहिले.( प्रतिनिधी)जय जय गौरी शंकर, संगीत सौभद्र, स्वयंवर, मानापमान, सुवर्णतुला, मदनाची मंजिरी, संत गोरा कुंभार अशा नाटकांतून निमकर यांनी भूमिका साकारल्या. या साऱ्या भूमिका त्यांनी वठवल्या असल्या तरी आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांची न घेतली गेलेली दखल अनेकांना खंत व्यक्त करायला लावते.चिपळूणचे संगीत क्षेत्र वैभवसंपन्न करण्यात निमकर यांचा वाटा महत्त्वाचा.परिस्थिती प्रतिकूल तरीही संगीत साधनेत खंड नाही.कोकणात संगीत नाटकांची परंपरा मोठी. निमकर यांनी असेल त्या परिस्थितीशी सामना करीत अनेक कार्यक्रम केले.ज्येष्ठत्वाकडे झुकले.