शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी येथे स्वसंरक्षण शिबिर उत्साहात

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

खाडे, घाणेकर उपस्थित : युगंधरा संमेलनात जिल्हा अ‍ॅमॅच्युअर असोसिएशनचे प्रदर्शन

चिपळूण : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे युगंधरा जिल्हास्तरीय विद्यार्थिनी संमेलन आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हा अ‍ॅमॅच्युअर कराटे असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक योगिता खाडे व रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रशिक्षक चेतन घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वसंरक्षण शिबिर झाले. सध्याची परिस्थिती लक्षात घेता महिला व विद्यार्थिनी यांना महिलांविषयी असलेले कायदे व अधिकार ज्ञात व्हावेत, त्यांचे मनोबल वाढावे, विद्यार्थिनी सबळ व्हाव्यात, या अनुषंगाने राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे युगंधरा या जिल्हास्तरीय विद्यार्थिनी संमेलन झाले. त्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रत्नागिरी जिल्हा व रत्नागिरी जिल्हा अ‍ॅमॅच्युअर कराटे असोसिएशन यांचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील २०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक योगिता खाडे यांच्यासोबत सर्व विद्यार्थिनींनी स्वसंरक्षण कलेचे प्रशिक्षण घेतले. आंतरराष्ट्रीय खेळाडू योगिता खाडे व रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रशिक्षक चेतन घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कराटे, किकबॉक्सिंग, सिकई, बेल्ट रेसलिंग व कुडो मार्शल आर्टचे प्रमुख सांभवी मयेकर (चिपळूण), स्नेहल महाडिक (चिपळूण), चांदणी झा (चिपळूण), सेजल आंब्रे (चिपळूण), सीमा चांदोरकर (गुहागर), प्राजक्ता वरेकर (गुहागर), चेतन घाणेकर (रत्नागिरी), विनोद राऊत (चिपळूण), मंदार साळवी (खेड), प्रतीक मोहिते (लांजा), हुजैफा ठाकूर (गुहागर), स्वप्नील आग्रे (राजापूर), आशिष गमरे (गुहागर) आदी प्रशिक्षकांच्या उपस्थितीत स्वसंरक्षण शिबिर झाले. शहराध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, शहरमंत्री संकेत देवस्थळी, संमेलनप्रमुख अपूर्वा सरपोतदार, भाग्यश्री रायकर, शिवराज कांबळे, लीना घाडीगावकर, नेत्रा राजेशिर्के आदींनी विद्यार्थिनी संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. स्वसंरक्षण शिबिराच्या प्रशिक्षणाबद्दल योगिता खाडे यांचे आभार मानले. या प्रशिक्षण शिबिराचा फायदा होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)