Ratnagiri: शिमगोत्सवाचा आनंद लुटला, काही तासातच काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:18 IST2026-03-11T17:18:14+5:302026-03-11T17:18:44+5:30

खेड : शिमगोत्सवासाठी गावी कोंडिवली रोहिदासवाडी येथे आलेल्या संतोष भागोजी कोंडविलकर (वय ४९) यांचे सोमवार, ९ मार्च रोजी पहाटे ...

Santosh Bhagoji Kondvilkar who had come to his village in Konkan for Shimgotsava died of heart attack | Ratnagiri: शिमगोत्सवाचा आनंद लुटला, काही तासातच काळाचा घाला

Ratnagiri: शिमगोत्सवाचा आनंद लुटला, काही तासातच काळाचा घाला

खेड : शिमगोत्सवासाठी गावी कोंडिवली रोहिदासवाडी येथे आलेल्या संतोष भागोजी कोंडविलकर (वय ४९) यांचे सोमवार, ९ मार्च रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनामुळे कोंडिवली परिसरासह मुंबईतील नातेवाईक व मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून मुंबईमध्ये यशस्वी व्यवसाय करणारे संतोष कोंडविलकर हे शिमगोत्सवासाठी गावी आले होते. रविवार, ८ मार्च रोजी त्यांनी सहकुटुंब देवीच्या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. रोहिदासवाडी येथील विठ्ठल मंदिरात त्यांनी उत्साहात पालखी नाचवत शिमगोत्सवाचा आनंद लुटला. मात्र, या आनंदाच्या वातावरणातच दुसऱ्याच दिवशी पहाटे काळाने घाला घातला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

‘संतोष दादा’ या नावाने ते परिसरात परिचित होते. त्यांच्या साध्या, मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. मंगळवार, दि. १० मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Web Title : रत्नागिरी: शिमगोत्सव की खुशी मातम में बदली; दिल का दौरा पड़ने से व्यक्ति की मौत

Web Summary : संतोष कोंडविलकर (49) का अपने गांव में शिमगोत्सव मनाने के बाद दिल का दौरा पड़ने से निधन हो गया। मुंबई स्थित एक ठेकेदार, उन्होंने अचानक निधन से पहले उत्साहपूर्वक उत्सव में भाग लिया, जिससे पीछे शोकग्रस्त परिवार और दोस्त रह गए। उनका सरल स्वभाव उन्हें लोकप्रिय बनाता था।

Web Title : Ratnagiri: Shimgotsav Joy Turns Tragic; Man Dies of Heart Attack

Web Summary : Santosh Kondvilkar, 49, died of a heart attack after celebrating Shimgotsav in his village. A Mumbai-based contractor, he participated enthusiastically in the festivities before his sudden demise, leaving behind grieving family and friends. His simple nature made him well liked.