शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपशाला महसूल खात्याचाच आशीर्वाद?

By admin | Updated: August 12, 2015 23:01 IST

राजापूर तालुका : विविध खाड्यांमध्ये राजरोसपणे चोरी, कारवाई रखडली

राजापूर : जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपशावर व वाहतुकीवर भरारी पथकाच्या सहाय्याने कारवाई सुरु असताना, राजापूर तालुक्यातील विविध खाड्यांमध्ये राजरोसपणे चालणाऱ्या वाळू उपशाकडे येथील महसूल प्रशासन डोळेझाक करत असल्याने सर्वसामान्य जनतेतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून त्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल आता उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, राजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसात एकही कारवाई न झाल्याचे उघड झाले आहे.काही दिवसांपूर्वी एका वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याला मुंबई गोवा महामार्गावर शिव्यांची लाखोली वाहिल्याची घटना ताजी असतानाच, राजापूर खाडीमध्ये राजरोसपणे मोठया प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नेमके साटेलोटे काय? असा सवाल विचारण्यात येत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात तर सहा ते सात वाळू व्यावसायिक एकत्रितपणे मोठया प्रमाणावर राजरोसपणे वाळूचे उत्खनन करत असून, काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी महसुलच्या त्या बडया अधिकाऱ्याने भेट दिली होती. तथापि, बरेच दिवस उलटून गेले तरी कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नसल्याचे पुढे आले आहे. याच खाडीतून दररोज मोठया प्रमाणात वाळू उपसा होत असून, त्याविरुध्द आजवर कुठलीच कारवाई न झाल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. अशीच परिस्थिती तालुक्याच्या अन्य भागातही असून, तेथील नदयांमध्ये व खाडयांमध्ये असाच वाळू उपसा राजरोसपणे सुरु आहे. याबाबत राजापूर तालुका प्रशासनाकडे चौकशीचा प्रयत्न केला असता, आपल्याला यासंदर्भात काहीही माहित नाही असे सांगून कानावर हात ठेवले आहेत. वरिष्ठ अधिकारी याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहेत. त्यामुळे एकूणच या प्रकारात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय बळावला आहे. (प्रतिनिधी)