नाट्य स्पर्धेत साईकृपाचे ‘चाकरमानी’ तृतीय

By Admin | Updated: February 2, 2015 00:05 IST2015-02-01T21:06:26+5:302015-02-02T00:05:53+5:30

ज्येष्ठ रंगकर्मी प्रफुल्ल घाग व संस्थेचे अध्यक्ष सदानंद मयेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण

Sairakrupa's 'Chakarmani' III in the theater competition | नाट्य स्पर्धेत साईकृपाचे ‘चाकरमानी’ तृतीय

नाट्य स्पर्धेत साईकृपाचे ‘चाकरमानी’ तृतीय

रत्नागिरी : माघी गणेशोत्सवानिमित्त मिरजोळे येथील ओमसाई मंडळ आयोजित नाट्य स्पर्धेत शिरगावच्या साईकृपा थिएटर्सच्या ग्रामीण जीवनावर आधारित मालवणी भाषेतील चाकरमानी या नाटकाला सांघिक तृतीय क्रमांक, नेपथ्य व उत्तेजनार्थ अभिनयासह तीन पारितोषिके प्राप्त झाली.ज्येष्ठ रंगकर्मी प्रफुल्ल घाग व संस्थेचे अध्यक्ष सदानंद मयेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सुहास साळवी व विजय साळवी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. साईकृपा थिएटर्सने सांघिक तृतीय क्रमांकासह नेपथ्य प्रथम, रामदास मोरे तसेच अभिनय उत्तेजनार्थ महेंद्र शिवलकर व सीमा मोरे यांना गौरवण्यात आले.
या नाटकाचे दिग्दर्शन संदीप शेट्ये यांनी केले. नाटकात संदीप पालकर, संजय शेट्ये, प्रशांत पालकर, मंदार शेट्ये, नीलराज शेट्ये, कल्पेश सुर्वे, महेश शेट्ये, संजय रावणंग, ऋषिकेश शेट्ये, सीमा मोरे, शिल्पा जाधव, अभिजीत शेट्ये, कुंदन पालकर, अनिल अवसरे, अंकुश पाटील, रोहित शेट्ये, पराग शेट्ये, रविराज शेट्ये, आशिष शेट्ये, साहील पालकर तसेच संजना पालकर व संगीता मोरे यांनी अभिनय केला. या नाटकासाठी रंगभूषा व पार्श्वसंगीत रामदास मोरे यांचे होते. प्रकाश योजनेची जबाबदारी गोपीकांत भुवड यांनी सांभाळली. विनय शेट्ये यांनी नाटक यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Sairakrupa's 'Chakarmani' III in the theater competition