शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी गॅसमधून पुन्हा ऊर्जानिर्मिती होणार

By admin | Updated: January 4, 2015 01:04 IST

हालचाली सुरू : १५ जानेवारीपासून निर्मिती शक्य

संकेत गोयथळे / गुहागरवर्षभर बंद असणारा रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. १५ जानेवारीपर्यंत प्रकल्पातील एका युनिटमधून वीजनिर्मिती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक गॅसची उपलब्धता करणे व तयार वीज कोणाला द्यायची, याबाबत नियोजन सुरू आहे.महाराष्ट्रातील विजेचे संकट दूर करण्यासाठी बुडीत गेलेल्या एन्रॉन म्हणजेच दाभोळ वीज प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करून आॅक्टोबर २००५मध्ये प्रकल्प सुरू करण्यात आला. सुरुवातीला आलेल्या अनेक अडचणींवर मात करून हा प्रकल्प चालू झाला. १,९०० मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे.२०१० ते २०१२ पर्यंत प्रकल्पातून सरासरी एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. रिलायन्सच्या गोदावरी प्रकल्पातून होणारा गॅसपुरवठा कमी होऊ लागल्याने वीजनिर्मितीवर परिणाम होत होता. २०१२ व २०१३ मध्ये कमी-अधिक प्रमाणात वीजनिर्मिती होत होती. गोदावरी प्रकल्पातून २६ जानेवारी २०१२ रोजी प्रथम गॅसपुरवठा बंद झाल्याने वीजनिर्मिती बंद करण्यात आली. पुढील वर्षभर गॅस उपलब्ध होईल त्याप्रमाणे वीजनिर्मिती होत होती. डिसेंबर २०१३ला प्रकल्पातून पूर्णपणे वीजनिर्मिती बंद झाली. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करण्यात आली. अशा स्थितीत वीजनिर्मिती करणाऱ्या पॉवर ब्लॉकमधील इलेक्ट्रिक विभागातील कमी केलेले कर्मचारी काही प्रमाणात पुन्हा नियुक्त करण्यात आले आहेत. डिसेंबर २०१४मध्ये आरजीपीपीएलचे अध्यक्ष गिरीष देशपांडे यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन गॅसवर तोडगा म्हणून एलएनजीमध्ये इतर द्रव्ये मिसळून त्याची किंमत कमी करून स्वस्त गॅसवर वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करीत रत्नागिरी गॅस प्रकल्प नव्या जोमाने सुरू होईल, असे संकेत दिले होते. पुढील काही दिवसांतच या प्रकल्पाचे सरव्यवस्थापक म्हणून पूर्वी कार्यरत असलेले एनटीपीसीचे प्रमुख गर्ग प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रकल्पाला भेट देणार आहेत.