शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण कराल तर याद राखा : कदम

By admin | Updated: October 5, 2015 00:16 IST

खेडमध्ये ५ तालुक्यातील जनतेसाठी शनिवारी भरणे येथील पाटीदार भवन येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

खेड : खेडसह संपूर्ण रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह संपूर्ण ग्रामपचांयती शिवसेनेच्या अधिपत्याखाली असताना जातीपातीच्या भिंती निर्माण करून शिवसेनेमध्ये समाजाचे राजकारण करण्यात आले. असं काय कारण घडलं, असा सवाल उपस्थित करीत समाजाचे राजकारण कराल तर याद राखा, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला.यावेळी त्यांचा रोख होता तो केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्याकडेच! राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या अशा धेंडांना दया दाखवू नका, असे आवाहन कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले़शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या वतीने खेडमध्ये ५ तालुक्यातील जनतेसाठी शनिवारी भरणे येथील पाटीदार भवन येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामदास कदम यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. खेडमध्ये अनंत गीते आणि रामदास कदम यांच्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून विस्तव जात नाही. त्यांच्यातील राजकीय मतभेद आता विकोपाला गेले आहेत. याच पार्श्वभूमीेवर कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गीते यांचे नाव न घेता त्यांच्या दिशेने प्रहार केला. समाजाचे राजकारण करणाऱ्यांची यापुढे गय करणार नाही, असेही ते म्हणाले.यावेळी रवींद्र वायकर, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, खेड पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, खेडचे तालुकाप्रमुख राजा बेलोसे, खेडचे शहरप्रमुख संजय मोदी उपस्थित होते. पालकमंत्री वायकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कदम यांनी विशेष कौतुक केले. लोकोपयोगी उपक्रम राबवणारे वायकर हे खरेखुरे सेवाव्रती आहेत, असे ते म्हणाले. वंचित शेतकऱ्यांसह इतर लोकांनाही कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांनी वितरण केलेल्या रोख रक्कम आणि धान्याचा यावेळी रामदास कदम यांनी विशेष उल्लेख केला. दापोलीचे किशोर देसाई यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा उल्लेख करीत देसाई यांना लवकर आठवण झाल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. (प्रतिनिधी)