शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना दिलासा

By admin | Updated: March 26, 2015 00:13 IST

शासनाला जाग : सेवेत असताना शिक्षकांचा मृत्यू

आनंद त्रिपाठी -वाटूळ सेवेत असताना मृत पावलेल्या राज्यातील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अखेर दिलासा मिळाला असून, ५ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर राज्यातील ६८६ कुटुंबियांना ४ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. तातडीने ही रक्कम शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून वितरित करण्यात येणार असल्याचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले.यासंर्दभात शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी ४ फेब्रुवारी २०१५ रोजी राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची भेट घेऊन मयत शिक्षकांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करण्याची विनंती केली होती. मागील ५ वर्षांपासून निधी अभावी ही मदत मिळाली नव्हती.अनुदानित संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतरांचा सेवेत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ६० हजार रुपयांची विशेष आर्थिक मदत केली जाते. तथापि वित्त विभागाकडून योग्य प्रमाणात तरतूद न झाल्याने राज्यातील मदत झालेल्या शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कुटुंबियांना या लाभापासून वंचित राहवे लागले होते. शासनाच्या नियोजनशून्य अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे मृत शिक्षकांच्या कुटुंबियांना मदत मिळण्यास विलंब होत होता. या विरोधात तातडीने कार्यवाही न झाल्यास शासनाच्या विरोधात भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा आमदार रामनाथ मोते यांनी दिला होता.

विशेष आर्थिक मदत
रत्नागिरी जिल्ह्यातील १० कुटुंबीयांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून, पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ६० हजाराची विशेष आर्थिक मदत मयतांच्या वारसाला मिळणार आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून लवकरात लवकर ही मदत मिळवण्यासाठी संघटना कटीबद्ध असेल.
- रमेश जाधव, अध्यक्ष,
जिल्हा शिक्षक परिषद