शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांना दिलासा

By admin | Updated: September 24, 2015 23:54 IST

चिपळूण पोलीस : वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न

चिपळूण : गणेशोत्सवाच्या काळात चिपळूण शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रित होण्यासाठी स्थानिक पोलीस व वाहतूक पोलिसांनी विशेष परिश्रम घेतल्याने वाहतूक सुरळीत सुरु आहे. नागरिकांनी व वाहन चालकांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस शहरात कारवाई करत आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांना जॅमरही लावले जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागली आहे. पार्किंगसाठीही नागरिकांना सवय लागली आहे. त्यामुळे नागरिकही पोलिसांना सहकार्य करत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांची भूमिका व नागरिकांचे सहकार्य यामुळे वाहतुकीची कोंडी फारशी झाली नाही. वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी वाहतूक शाखेने नगर परिषदेच्या सहकार्याने २० ठिकाणी सूचना फलक व दिशादर्शक फलक लावले आहेत. रिक्षाचालकांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. पेट्रोलचे दर कमी झाले असतानाही रिक्षाचालक दामदुप्पट भाडे आकारतात. यासाठी उपप्रादेशिक परिवहन खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार दरपत्रकांचा फलक रेल्वेस्टेशन व मध्यवर्ती एस. टी. स्टॅण्ड येथे लावण्यात आले आहेत. त्यानुसारच नागरिकांनी रिक्षा चालकांना भाडे द्यावे. यामुळे रिक्षाचालक व नागरिक यांच्यात वाद न होता संवाद साधला जाईल. शहरातील रिक्षाचालकांना शिस्त असावी, रिक्षाचालकांची प्रतिमा सुधारावी यासाठी रिक्षा चालक व मालकांना गणवेश देण्यात आले आहेत. सध्या रिक्षा चालक- मालक हे गणवेश परिधान करुन व्यवसाय करत आहेत. त्यांना दर रविवारी गणवेश परिधान न करण्याची मुभा देण्यात आली आहे. बेदरकारपणे वाहन चालविणे, मोबाईलवर बोलणे, दारु पिऊन वाहन चालविणे, परवाना नसणे, इंडिकेटरचा वापर न करणे, सीट बेल्ट न लावणे आदी अनेक कारणांमुळे वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दारु पिऊन वाहन चालविल्या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या क्वॉलिटी बेकरी ते गुहागर नाका दरम्यान वाहतुकीत कमालीची सुधारणा झाली आहे. एकूणच वाहन चालकांना शिस्त लागून त्यांनी सहकार्य केल्यास कारवाईचा प्रश्नच उरणार नाही असे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात सर्वच रस्त्यांवर गर्दी झाली होती. या काळात नगर परिषद, व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल उपनिरीक्षक परदेशी यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. (प्रतिनिधी)