शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

रत्नागिरी : आपुलकीतर्फे सफाई कामगारांचे गोडकौतुक, नववर्षदिनी भेट, दीडशे कामगारांना मिठाईचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 17:03 IST

रत्नागिरी शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. येथील आपुलकी सामाजिक संस्थेने शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.

ठळक मुद्दे नववर्षदिनी भेट, दीडशे कामगारांना मिठाईचे वाटपआपुलकीतर्फे सफाई कामगारांचे गोडकौतुकरत्नागिरीत पहिल्यांदाच उपक्रम, सौरभ मलुष्टे यांचा पुढाकार

रत्नागिरी : शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. शहरातील नाले, गटारे, कचराकुंड्या, रस्ते तसेच शहर परिसर स्वच्छ करण्यात सफाई कामगार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्या नवीन वर्षाची सुरूवात ही गोडकौतुक करून व्हावी म्हणून येथील आपुलकी सामाजिक संस्थेने रत्नागिरी शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.शहराची स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगारांना वेतन मिळते हे जरी खरे असले तरी हे काम करणे खूप अवघड आहे. शहरातील घाण या कामगारांकडून स्वच्छ केली जाते. शहराची स्वच्छता करणे व घरी जाणे यापलिकडे त्यांचे दुसरे आयुष्य नाही. कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा सहभाग नसतो. मात्र, तरीही मनापासून संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचे काम हे सर्व कामगार करतात. अशा या कामगारांचा नववर्षाचा पहिला दिवस आनंदमयी करावा या हेतूने आपुलकी सामाजिक संस्थेचे सौरभ मलुष्टे यांनी पुढाकार घेतला.

या कामगारांचे गोडकौतुक करण्यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, उद्योजक किरण उर्फ भय्या सामंत, मुख्याधिकारी अरविंंद माळी, उपनगराध्यक्षा स्मितल पावसकर, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, नगरसेवक बंड्या साळवी, शिल्पा सुर्वे, राजन शेट्ये, प्रशांत साळुंखे, विलास चाळके, बारक्या हळदणकर, भय्या भोंगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.अशा पद्धतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आला, या सफाई कामगारांचा वेतनवाढीचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही यानिमित्ताने आपण देत असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनीही सफाई कामगारांसाठीचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपुलकी संस्थेचे सौरभ मलुष्टे, प्रणय पोळेकर, जान्हवी पाटील यांच्यासह राजेंद्र चव्हाण, किशोर मोरे, राजेश शेळके, विजय पाडावे, अभिजित नांदगावकर, राजेश कळंबटे, बंटी पाथरे, सुदीप जाधव, प्रशांत हर्चेकर, नीलेश कदम, सचिन बोरकर, तन्मय दाते यांचे सहकार्य लाभले.सौरभ मलुष्टे यांचा पुढाकारआपुलकी या सामाजिक संस्थेचे वर्षभर समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांसाठी विविध उपक्रम सुरू असतात. यापूर्वी रत्नागिरीतील नगरपालिकेच्या २० होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेकडून शैक्षणिक मदतही करण्यात आली असून, मनोरूग्ण, बंदिवान यांच्या पुनर्वसनासाठी मार्गदर्शक व विविध सण-उत्सवानुसार कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यासाठी उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या पुढाकाराने आतापर्यंत अनेकांना मदत करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान