शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सभापती निवडीत रत्नागिरीला झुकते माप; भाजपची पाटी कोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:13 IST

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर बुधवारी विषय समित्यांच्या सभापती पदांची निवडही अपेक्षेप्रमाणे बिनविराेध झाली. यामध्ये महिला ...

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर बुधवारी विषय समित्यांच्या सभापती पदांची निवडही अपेक्षेप्रमाणे बिनविराेध झाली. यामध्ये महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी मयुरी शिर्के, समाजकल्याण समिती सभापतिपदी ॲड. सुयोग कांबळे, शिक्षण व अर्थ सभापतिपदी नंदकुमार मुरकर आणि कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतिपदी महेश नाटेकर याची निवड झाली. चारपैकी दोन सभापतिपदे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला मिळाली आहेत. दोन महत्त्वाच्या लढतींमध्ये विजय मिळवणाऱ्या शिंदेसेनेच्या शिलेदारांना सभापतिपदाचे बक्षीस मिळाले आहे.महिला व बालकल्याण सभापती शिर्के या चिपळूण तालुक्यातील कळवंडे गटातून, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती नाटेकर गुहागर तालुक्यातील पडवे गटातून, शिक्षण व अर्थ समिती सभापती नंदकुमार मुरकर हे रत्नागिरी तालुक्यातील गोळप गटातून आणि ॲड. कांबळे हे रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गटातून निवडून आले आहेत.या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी काम पाहिले. या निवडीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव हे उपस्थित होते.सभापतिपदाच्या निवडीनंतर शिंदेसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. सर्व नूतन सभापतींना त्यांच्या दालनात सन्मानपूर्वी विराजमान करताना माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक, माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, संजय साळवी, जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, महेश म्हाप, अण्णा कदम, नेताजी पाटील, गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरीला दोन सभापतिपदेजिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे नूतन सभापती नंदकुमार मुरकर यांनी पाच वेळा निवडून आलेले सदस्य असून, माजी उपाध्यक्ष उदय बने यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. हातखंबा गटात उभे असलेले समाजकल्याण समितीचे माजी सभापती पर्शुराम कदम यांचा ॲड. सुयोग कांबळे यांनी पराभव केला. त्यांना समाजकल्याण सभापतिपद देण्यात आले. या दोन्ही निवडणुका शिंदेसेनेसाठी महत्त्वाच्या होत्या. त्यात मिळवलेल्या विजयामुळे या दोघांना सभापतिपदाचे बक्षीस मिळाले आहे.

नाटेकर दुसऱ्यांदा सभापतीमहेश नाटेकर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविले होते. त्यावेळी त्यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी हाती. आता त्यांच्याकडे पुन्हा कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपद देण्यात आले आहे.