शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:33 IST

विविध ठिकाणी पडझड : अडीच लाखांची हानी, रत्नागिरी, लांजात कमी नुकसान

रत्नागिरी : सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले असून, जागोजागी पाणी भरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. संततधार पडणाऱ्या पावसमुळे पडझड होऊन जिल्हाभरात सुमारे २ लाख ५२ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सोेमवारी सांयकाळी पावसाने क्षणभर विश्रांती घेतली.रविवारपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी व लांजा तालुका सोडल्यास सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंडणगड येथील तोडली येथे घराचे ६ हजार ८०० रुपयांचे नुकसान, मौजे भिंगळोली येथे घराचे १४ हजार ८५० रुपयांचे नुकसान, मौजे मंडणगड येथे घरांवर बांध कोसळून २१९५ रुपयांचे नुकसान झाले. मौजे पालघर येथे चंद्रकांत तपकिरी यांचे कंपाऊंडचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, मंडणगड तालुक्यात दोन दिवसात सुमारे ३३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दापोली तालुक्यात पाजपंढरी येथे २ घरांचे १६ हजार ४०० रुपयांचे किरकोळ नुकसान झाले. हर्णै येथे नथुराम वैद्य यांच्या गडग्याचे ४ हजार ८०० रुपयांचे, तर एका घराचे २१०० रुपयांचे किरकोळ नुकसान झाले. मौजे पाडले येथे घराचे २३ हजार रुपयांचे किरकोळ नुकसान झाले. गव्हे येथे घराचे १००० रुपयांचे किरकोळ, तर मांदिवले येथे एक गोठा पूर्ण कोसळला असून, मालकाचे ७५ हजार रुपयांचे नुकसान नोंदवले गेले आहे. दापोली येथे सुमारे १ लाख २३ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले.खेड येथे रस्त्यात दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती. मौजे कसबा नातू येथे बांध कोसळल्याने १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात मौजे विल्ये येथे गोठ्याचे किरकोळ नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात चिखली-कारोळ व पालपेणे साखरी त्रिशुळ येथील मोऱ्या ढासळल्याने नुकसान झाले आहे. मौजे कासुर्ली येथे घरावर झाडाची फांदी पडून ४ हजार ५५० रुपयांचे, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची कंपाऊड वॉल कोसळल्याने २९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गुहागरात एकूण ३३ हजार ४५० रुपयांचे नुकसान झाले आहे.संगमेश्वर येथे ४ घरांचे ३३ हजार ६५० रुपयांचे नुकसान झाले आहे, तर मौजे माखजन येथे घरावर झाड पडल्याने दोन घराचे ३ हजार २१० रुपयांचे नुकसान झाले आहे. राजापूरमध्ये एका घरांची भिंत कोसळून ५ हजार रुपये, तर राजापूर वरचीवाडीमध्ये पडवी कोसळल्याने ५ हजार रुपये नुकसान असे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात २,५२,८०० इतके नुकसान झाले आहे. (वार्ताहर)राजापुरात व्यापाऱ्यांची धावपळदापोलीत अंगणवाडी जमीनदोस्तभोर महाड मार्गावरील वाहतूक बंद; बस अडकलीगावखडीत घर कोसळले, महिला बेघर