शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मतदार जागृती प्रचार प्रसिद्धीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

By शोभना कांबळे | Updated: January 23, 2024 17:51 IST

जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार; उद्या मुंबईत वितरण 

रत्नागिरी : मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग (SVEEP) उपक्रम राबवून मतदार यादी दुरुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी कोकण विभागातून रत्नागिरीचेजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची निवड करण्यात आलेली आहे. मुंबईत २४ रोजी या पुरस्काराचे वितरण राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.त्याचबरोबर उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, तसेच रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांचीही उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार २०२४ साठी निवड करण्यात आलेली आहे. तसेच उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कोकण विभागातून चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांची निवड करण्यात आली आहे.उत्कृष्ट समाजमाध्यम पुरस्कार २०२४ साठी समाजमाध्यमांद्वारे उत्कृष्ट प्रचार-प्रसिद्धीकरिता राज्यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयास प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यासाठी समाजमाध्यम समन्वयक वैभव विजय आंबेरकर यांची निवड करण्यात आलेली आहे. पारितोषिक वितरण २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबई चर्चगेट येथील जयहिंद कॉलेज येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. २५ जानेवारी रोजी १४ वा राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये २०२३-२४ या वर्षभराच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून निवडणूक विषयासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण कामगिरीच्या आधारे राज्यातीलबअधिकाऱ्यांची संस्थांची तसेच व्यक्तींची राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पारितोषिक व सत्कारासाठी राज्यस्तरावरून निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूक