शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस रुसला...!

By admin | Updated: July 1, 2014 00:27 IST

अकरा वर्षात यंदा गाठला नीचांक रत्नागिरीतील स्थिती

रत्नागिरी : पावसाने यावर्षी पाठ फिरवली असून, गेल्या अकरा वर्षातील जून महिन्यात पडलेल्या पावसापेक्षा यावर्षी जून महिन्यात पडलेला पाऊस हा सर्वात कमी आहे. गेल्या अकरा वर्षात गतवर्षी २०१३ साली जूनमध्ये पडलेला पाऊस सर्वाधिक होता.दरवर्षी ७ जूनला पडणारा पाऊस यावर्षी मात्र, अजूनही गायबच आहे. तुरळक सरी वगळता म्हणावा तसा पाऊस अजूनही पडलेला नाही. त्यामुळे पावसाची सगळीच नक्षत्र कोरडी यंदा जातात की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भरपेट पाणी पुरवणारी पावसाची हुकमी नक्षत्र कोरडी गेल्याने आता शेतकऱ्याकडे वाट पाहण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही.पावसावर विसंबून पेरणी केलेल्या शेतकऱ्यावर आता डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पेरण्याही झालेल्या आहेत. मात्र, पाऊसच गायब झाल्याने पुढील कामे रखडली आहेत. उन्हाचाही कडाका वाढल्याने आता पाऊस या एक दोन दिवसात पडला नाही तर रोपे सुकण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्क्त केली जात आहे.जाणकारांच्या मते जूनमध्ये पाऊस पडला नाही तरी जुलैमध्ये जोरदार पडेल. मात्र, सध्या पावसाबद्दल कुठलेच भाकीत करता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गेल्या ११ वर्षात प्रत्येक वर्षी जूनमध्ये पडलेल्या पावसाच्या तुलनेने या वर्षीच्या जून महिन्यात पडलेला पाऊस सर्वात कमी (सरासरी २९७.३७ मिलीमीटर )आहे.जून २०१३ मध्ये सर्वाधिक (सरासरी १३४८ मिलीमीटर) पावसाची नोंद आहे. हा जून महिना कोरडा गेला असला तरी आता एक दोन दिवसात पाऊस सुरू होण्याचे संकेत मिळत असले तरी उकाडाही तेवढाच असह्य झाला आहे. त्यामुळे पावसाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. पाऊस गायब झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)