शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

मरणोत्तर देहदानासाठी जनजागृती

By admin | Updated: September 8, 2015 22:23 IST

नारायण सावंत : नेत्रदान, चमडीदान, देहदानासाठी भरला अर्ज

पाली : रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावातील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच नारायण शिवराम सावंत यांनी मरणोत्तर नेत्रदान, चमडीदान, देहदानसाठी स्वत:चा अर्ज भरला आहे. याविषयी आपण जनजागृती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.स्वत:चे शरीर दुसऱ्याच्या स्वाधीन करण्यास कोणी तयार नसतो. त्यातही त्यांचे नातेवाईक अशा गोष्टीचे कधीच समर्थन करत नाहीत. मात्र, या सर्वाला बगल देत नाणीज येथील नारायण सावंत यांनी नवा आदर्श ठेवला आहे. केवळ नेत्रदान नव्हे; तर चमडीदान आणि देहदानाचाही त्यांनी निर्णय घेतला आहे. नारायण सावंत हे ८२ वर्षांचे असून, अजूनही ते एखाद्या तरुणाप्रमाणे जिद्दीने सामाजिक कार्य करीत आहेत. मरणोत्तर नेत्रदान, चमडीदान, देहदान यासाठी नारायण सावंत यांनी शरीररचनाशास्त्र विभाग भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, सावर्डे - चिपळूण येथे स्वत:चा अर्ज भरुन पाठविणार आहेत, अशी माहिती देऊन इतर दहाजणांचा अर्जही लवकरच पाठवणार असल्याची त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, आपल्या देशात लाखो लोक अंध आहेत, त्याचबरोबर अनेकजण अपंग आहेत. त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्याचप्रमाणे देहदान, चमडीदान, नेत्रदान करणे, याबाबत सामाजिक पातळीवर जनजागरण करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. आपले उर्वरित आयुष्य आपण याबाबत जनजागृती करण्यास घालविणार आहोत, असे त्यांनी सांगितले. सावंत हे नाणीज गावचे सरपंच असताना शासनाच्या विविध योजना त्यांनी राबवून जनतेला त्याचा लाभ मिळवून दिला. शासनाच्या विविध योजनेचा लाभ जनतेला कसा होईल, याबाबत त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सावंत आज ८२ वर्षांचे असूनही सामाजिक कार्य करीत आहेत. (वार्ताहर)स्वत:चा व इतर १० जणांचाही फॉर्म सावर्डे येथील शरीररचना शास्त्र ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय येथे लवकरच पाठविणार आहे, असे नारायण सावंत यांनी सांगितले. नारायण सावंत यांनी घेतलेल्या निर्णयाचे परिसरातून स्वागत होत आहे. आपल्याबरोबर इतरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.