शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर नगरपंचायतीची मालमत्ता मोजणी सुरु

By admin | Updated: January 7, 2015 23:59 IST

गुहागर बाजारपेठेमध्ये होणारी वाहतूक कोंडी चर्चेचा विषय बनला आहे.

गुहागर : येथील नगरपंचायतीची सद्यस्थितीतील मालमत्ता स्पष्ट होऊन करआकारणी व नियमित कामकाज पद्धती स्पष्ट व्हाव्यात, यासाठी पुणे येथील एका कंपनीद्वारे मालमत्ता मोजणीचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे. याचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.या शुभारंभानंतर कंपनीचे कर्मचारी व नगरसेवकांची विशेष बैठक घेऊन मालमत्ता मोजणीच्या कामासंदर्भात माहिती घेण्यात आली. मोजणीसाठी प्रथम नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी घेतले जाणार आहे. मोजणीमध्ये घरांसह मोकळी जागा, नद्या, नाले आदी सर्व भागांना नंबर दिले जाणार आहेत. या मोजणीसाठी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी जाणार असून, मोजणीनंतर जागेच्या मुल्यानुसार वेगवेगळे मूल्य स्पष्ट करणारे झोन करण्यात येणार आहेत.मोजणीमध्ये आताच्या स्थितीतील सर्व मालमत्तेच्या नंबरप्रमाणे फोटोद्वारे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. मोजणीनंतर संबंधिताना नगरपंचायतीतर्फेे नोटीस दिली जाणार असून, यासंबंधी ग्रामस्थांच्या हरकतीही मागवल्या जाणार आहेत. नव्या सीआरझेड कायद्यानुसार गुहागर नगरपंचायतीला सीआरझेड कायदा-२ लागू शकतो. याबाबत चर्चा झाली. नगरपंचायतीचा विकास आराखडा तया करण्यासंदर्भात भास्कर जाधव यांनी सूचना केल्या.सध्या असलेल्या मच्छी मार्केट शेजारी ८८ लाख ५० हजार निधीतून अद्ययावत मच्छी मार्केट बांधण्यासाठी जागा अपुरी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने तळे बुजवून मच्छी मार्केटसाठी जागा मोकळी केली जाईल, असे सांगितले. वन विभागाकडे असलेल्या गुहागर समुद्र किनारी सुरुबनातील नऊ दुकानदारांची दुकाने पक्की झाली आहेत. दुकान भाडेतत्त्वावर बांधण्यासंदर्भात वनपाल कीर यांना सूचना दिल्या.यावेळी नगराध्यक्ष जयदेव मोरे, उपनगराध्यक्ष स्नेहा वरंडे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पद्माकर साटेकर, दीपक कनगुटकर, नरेश पवार, प्रवीण रहाटे, नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)गुहागर बाजारपेठेमध्ये होणारी वाहतूक कोंडी चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन व्याडेश्वर मंदिराशेजारील खोक्यांची बांधकामे तोडून टाका, अशी स्पष्ट सूचना भास्कर जाधव यांनी केली, तर कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करायची नाही, असे नवनिर्वाचित मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी सांगितले.