प्रवीण भाटकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST2021-09-25T04:33:43+5:302021-09-25T04:33:43+5:30

माधवी जाधव मंडणगड : तालुक्यातील मंडणगड बाैद्ध समाजसेवा संघाचे क्रियाशील पदाधिकारी सिद्धार्थ जाधव (तुळसकर) यांच्या पत्नी माधवी जाधव (५८) ...

Praveen Bhatkar passes away | प्रवीण भाटकर यांचे निधन

प्रवीण भाटकर यांचे निधन

माधवी जाधव

मंडणगड : तालुक्यातील मंडणगड बाैद्ध समाजसेवा संघाचे क्रियाशील पदाधिकारी सिद्धार्थ जाधव (तुळसकर) यांच्या पत्नी माधवी जाधव (५८) यांचे आकस्मिक निधन झाले. त्वचाराेग बरा करण्यात त्यांचा हातखंडा हाेता. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली असा परिवार आहे.

सुमित्रा माेरे

खेड : तालुक्यातील काेरेगाव येथील सुमित्रा तानाजीराव माेरे (९५) यांचे निधन झाले. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख देवेंद्र माेरे यांच्या त्या माताेश्री हाेत. त्यांच्या पश्चात ५ मुलगे, दाेन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

अरुण नवरे

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजाेळे-हनुमाननगर येथील रहिवासी अरुण शांताराम नवरे (७७) यांचे निधन झाले. स्टेट बॅंकेत ३३ वर्षे विविध ठिकाणी काम करून ते शाखाप्रमुख म्हणून निवृत्त झाले हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

विजयालक्ष्मी गुजर

चिपळूण : तालुक्यातील काेसबी येथील विजयालक्ष्मी ऊर्फ माई गुजर (८३) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. उद्याेजक अनिल गुजर यांच्या त्या माताेश्री हाेत. त्यांच्या पार्थिवावर काेसबी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन विवाहित मुली, दाेन मुलगे, नात सुना, जावई असा परिवार आहे.

Web Title: Praveen Bhatkar passes away