शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये ६१ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात

By admin | Updated: April 24, 2015 01:27 IST

राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ दहा ग्रामपंचायती

खेड : तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि १० पोटनिवडणुकांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. ८७ ग्रामपंचायतींपैकी ६१ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे.
यातील भरणे आणि भडगाव या ग्रामपंचायतींमध्ये सेना-मनसे युतीने चांगले यश मिळविले. १० ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संमिश्र यश मिळाले आहे. उर्वरित १६ ग्रामंपचायती गाव पॅनेलच्या माध्यमातून बिनविरोध निवडून आल्या आहेत. मात्र, १० पोटनिवडणुकांची आकडेवारी उशिरापर्यंत हाती आली नव्हती़
खेड तालुक्यातील भरणे, तळे, शेरवली, संगलट, कर्जी आमशेत, कोरेगाव, सुकदर, दयाळ, होडखाड, तुंबाड, शिवतर, आंबये, चाकाळे, हुंबरी, वडगाव, कुळवंडी, कशेडी आदी ग्रामपंचायती शिवसेनेने खेचल्या आहेत. या तुलनेत मुरडे आणि पोयनार ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्या आहेत. पोयनार ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला १०० टक्के यश मिळाले आहे. राष्ट्रवादीचे अजय बिरवटकर यांचे वर्चस्व असल्याने ही ग्रामंपचायत राष्ट्रवादीकडे गेली. या तुलनेत तालुक्यात शिवसेनेने आपली भगवी लाट कायम ठेवली आहे.
भडगाव ग्रामपंचायत यापूर्वी मनसेच्या ताब्यात होती़ आता शिवसेनेला ७, तर मनसेला अवघ्या ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेने ही ग्रामपंचायत खेचून आणली आहे. भरणे ग्रामपंचायतीमध्ये सेना आणि मनसेला ९ जागा जिंकता आल्या आहेत, तर राष्ट्रवादीला अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
यावेळी आमदार संजय कदम यांनी सलग तीन दिवस भरणे येथे आपला मुक्काम ठेवला होता. त्यामुळे भरणे यावेळी राष्ट्रवादीकडे जाणार, अशी अपेक्षा होती़ मात्र यावेळी मतदारांनी पूर्णपणे अपेक्षाभंग करीत सत्ता सेना आणि मनसेच्या ताब्यात दिली आहे़ (प्रतिनिधी)