Ratnagiri: ठेकेदाराला मारहाण करणाऱ्या मारेकऱ्याचा मोबाइल पोलिसांकडे, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:11 IST2025-12-01T17:10:58+5:302025-12-01T17:11:40+5:30
मारहाणीनंतर तीन अज्ञात व्यक्तींनी तेथून पलायन केले

संग्रहित छाया
चिपळूण : तालुक्यातील पाचाड येथील ठेकेदार अनिल मारुती चिले यांची कार अडवून तिघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री शहरालगतच्या गुहागर बायपास रोडवरील लेणी परिसरात घडली होती. याप्रकरणी येथील पोलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू असून, पाेलिसांच्या हाती एका मारेकऱ्याचा माेबाइल घटनास्थळी सापडला आहे. त्यावरुन पाेलिस त्यांचा शाेध घेत आहेत.
अनिल चिले हे त्यांच्या कारने एकटेच गुहागर बायपास रोडने चिपळुणातील पाचाड येथे घरी जात होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला एका वळणावर त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवरून तीन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी दुचाकी चिले यांच्या कारच्या समोर आडवी उभी करून वाद घातला. त्यानंतर चिले यांना कारच्या बाहेर खेचून त्यांना मारहाण केली.
या मारहाणीनंतर त्या तीन अज्ञात व्यक्तींनी तेथून पलायन केले. मात्र, या झटापटीत मारेकऱ्यांपैकी एकाचा मोबाइल गाडी जवळ सापडला आहे. त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून, संबंधितांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.