शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

पगार न दिल्याने चोरले पिस्टन, इस्लामपूर येथून एकजण अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 6:57 PM

Crime News Ratnagiri Satara Sangli news-गुहागर तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे ७ लाखांचे १० पितळी पिस्टन चोरल्याप्रकरणी रुपकिशोर महतो (२३) याला गुहागर पोलिसांनी इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथून अटक केली आहे. ही चोरीची घटना घडल्यावर बेपत्ता झालेल्या किशोर महतो याचा शोध पोलीस घेत होते.

ठळक मुद्देमालकाला अद्दल घडविण्यासाठी चोरले पिस्टनगुहागर तालुक्यातील घटना, एकजण ताब्यात, एकाचा शोध सुरू

असगोली : गुहागर तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे ७ लाखांचे १० पितळी पिस्टन चोरल्याप्रकरणी रुपकिशोर महतो (२३) याला गुहागर पोलिसांनी इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथून अटक केली आहे. ही चोरीची घटना घडल्यावर बेपत्ता झालेल्या किशोर महतो याचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान, ही चोरी पगाराचे पैसे न दिल्याने मालकाला अद्दल घडविण्यासाठी महतो बंधूंनी केली होती. चोरीचे पिस्टन कुठेही न विकता पुणे येथे त्यांनी लपवून ठेवले होते, असे चौकशीत समोर आले आहे.आनंद जगदाळे (रा. पेडगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांनी त्यांचा पोकलेन अवधूत सुशील वेल्हाळ यांच्या निगुंडळ येथील खडी क्रशरवर भाड्याने दिला होता. हा पोकलेन चालविण्याचे काम किशोर महतो (मूळ गाव आंबो, ता. परखंड, जि. हजारीबाग, झारखंड) करत होता. १९ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता किशोर महतो हा दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ करुन कामगार राहात असलेल्या ठिकाणाहून बेपत्ता झाला होता.

२० जानेवारी रोजी जगदाळे यांनी खडी क्रशरवर जावून पोकलेनची पाहणी केली असता, कंट्रोल व्हिल आणि स्विंग बेअरिंग खोलून त्यातील जेसीबी कंपनीचे १० पितळी पिस्टन चोरल्याचे लक्षात आले. या संदर्भात गुहागर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवताना जगदाळे यांनी त्यांचा चालक किशोर महतोवर संशय घेतला होता.या घटनेचा तपास पोलीस अंमलदार हनुमंत नलावडे हे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करत होते. हनुमंत नलावडे यांनी किशोर महतोच्या मोबाईल कॉल्सची तपासणी केली. त्यामध्ये किशोरचा भाऊ रुपकिशोर महतो हा १९ जानेवारीच्या रात्री निगुंडळ परिसरात आल्याचे लक्षात आले.

या माहितीवरुन गुहागर पोलिसांना रुपकिशोर महतो हा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे असल्याचे समजले. हनुमंत नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल राजू कांबळे, सचिन पाटील यांनी ५ फेब्रुवारी रोजी इस्लामपूरला जात रुपकिशोर महतोला अटक केली.किशोर महतो याला जगदाळे यांनी काही महिन्यांचा पगार दिला नव्हता. ही गोष्ट त्याने भावाला सांगितली. त्यानंतर मालकाला अद्दल घडविण्यासाठी पोकलेनचे पार्ट काढून ठेवण्याचा कट शिजला. त्याप्रमाणे रुपकिशोर महतो निगुंडळला आला. दोघांनी पोकलेन खोलून त्यातील किमती पिस्टन काढले. पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम आणि त्यांच्या टीमने फुरसुंगी येथून हे पितळी पिस्टन ताब्यात घेतले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसरSangliसांगली