शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत खुलेआम वाळूचोरी

By admin | Updated: August 11, 2015 00:08 IST

यंत्रणेचे दुर्लक्ष : दररोज शेकडो ब्रास सागरी वाळूचे बेकायदा उत्खनन

रत्नागिरी : जिल्ह्यात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. रत्नागिरीच्या भरारी पथकाकडून गेल्या दोन दिवसात चिपळूणच्या गोवळकोट खाडीतील वाळू चोरणाऱ्यांवर झालेल्या कारवाईचे स्वागत होत आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांच्या काळात शेकडो ब्रास सागरी वाळूची चोरी राजरोस होत असूनही ती महसूल विभाग, भरारी पथकाला दिसू नये, याबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत असून, चर्चेला उधाण आले आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराजवळच लागून असलेल्या पांढरा समुद्र येथील किनाऱ्यावरील वाळू खणून ती छोट्या वाहनांतून राजरोस नेली जाते, याकडे महसूल खात्याचे दुर्लक्ष असल्याचे व लाखो रुपयांची रॉयल्टी बुडत असल्याचे वृत्त लोकमतने काही काळापूूर्वी दिले होते. त्यानंतर तहसीलदारांनी पांढरा समुद्र येथे कारवाई केली. मात्र, त्यानंतर ही मोहीम थंडावली. पुन्हा पांढरा समुद्र खणण्याचे काम अव्याहतपणे सुरू झाले आहे. पांढऱ्या समुद्रापासून जवळच असलेल्या पंधरामाड, मिऱ्या, जाकीमिऱ्या येथे सागरी आक्रमणामुळे धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी करोडो रुपये खर्च करावे लागले आहेत. मात्र, पांढरा समुद्र येथील किनारा सातत्याने खणला जात असून, त्यामुळे सागराचे पाणी आत घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी धोका निर्माण झाल्याचे सांगत भविष्यात येथेही धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा सागरी वाळूचे राजरोस होणारे उत्खनन व चोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र, कारवाई नेमकी कोणत्या कारणाने होत नाही, असा सवालही नागरिकांतून केला जात आहे. गोवळकोट येथे गेल्या दोन दिवसात रत्नागिरीच्या भरारी पथकाने वाळूमाफियांना दणका देणारी कारवाई केली आहे. अशीच कारवाई पांढरा समुद्र येथे कधी होणार असा सवाल केला जात आहे. या ठिकाणी दिवसा व रात्रीही छोट्या वाहनांमधून सागरी वाळू भरून ती विक्रीसाठी नेली जात आहे. वाहने किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी दगडी रस्ताही तयार करण्यात आला आहे. ही स्थिती असताना हा रस्ता उखडण्याची कारवाई शासकीय खात्याने का केली नाही, हा चर्चेचा विषय ठरला आहे. (प्रतिनिधी)ढिगारा पोखरलागेल्या दोन वर्षांपूर्वी मिरकरवाडा बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे उपसा करण्यात आला. या वाळूवजा गाळाचा ढिगारा पांढरा समुद्रकिनाऱ्यावरच करून ठेवण्यात आला आहे. त्या ढिगाऱ्यातील निम्मी वाळू मेरिटाईम बोर्डाला विकत देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित निम्म्या ढिगाऱ्यालाही वाळूमाफियांनी पोखरले आहे. या ढिगाऱ्याशेजारीच असलेल्या वाळूच्या दुसऱ्या ढिगाऱ्यातही वाळू चोरीमुळे बोगदे तयार झाले आहेत. मिरकरवाडाच्या दिशेने किनाऱ्यावरील वाळूही खणल्याचे दिसून येत आहे. हे उत्खनन व वाळूचोरी सुरूच राहिल्यास काही काळाने पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावरही करोडो रुपये खर्चून धूपबंधारा बांधावा लागणार असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.