शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाची घरोघरी ऑनलाईन पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 13:07 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची धामधूम संपली असली तरी आता निवडणूक आयोगाने मतदार पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. विशेष म्हणजे आयोगाने सुरू केलेल्या व्होटर हेल्प लाईन किंवा संकेतस्थळावरूनही स्वत: मतदाराला घरच्या घरी बसून मोबाईलद्वारे ऑनलाईन पडताळणी करणे शक्य झाले आहे. याद्वारे मतदार यादीत दुरूस्तीही करता येणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाची घरोघरी ऑनलाईन पडताळणी यादी अद्ययावत ठेवण्यासाठीचा नवा उपक्रम

रत्नागिरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची धामधूम संपली असली तरी आता निवडणूक आयोगाने मतदार पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. विशेष म्हणजे आयोगाने सुरू केलेल्या व्होटर हेल्प लाईन किंवा (nvcp.in) संकेतस्थळावरूनही स्वत: मतदाराला घरच्या घरी बसून मोबाईलद्वारे ऑनलाईन पडताळणी करणे शक्य झाले आहे. याद्वारे मतदार यादीत दुरूस्तीही करता येणे शक्य झाले आहे.दुबार मतदान होऊ नये, त्याचबरोबर विविध प्रकारच्या दुरूस्ती करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने सध्या मतदार पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत सध्या बीएलओ मतदाराच्या घरी जाऊन त्याची खरी माहिती घेत आहेत. तसेच नाव, वय, फोटो, लिंग, पत्ता, मृत्यू झाल्यास त्याची नोंद आदी दुरूस्ती करणे, हे या पडताळणी कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी मतदारांनाही घरच्या घरी पडताळणी किंवा दुरूस्ती करता यावी, यासाठी आयोगाने व्होटर हेल्प लाईन हे अँड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन तयार केले आहे.त्याचबरोबर (nvcp.in) या संकेतस्थळावरूनही दुरूस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या सुविधांच्या माध्यमातून अगदी घरबसल्या १८ वर्षे झालेल्या मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे. अथवा मृत्यू झालेल्या सदस्याचे नाव वगळता येणार आहे. नाव, वय, फोटो, लिंग, पत्ता यातही दुरूस्ती करता येणार आहे. या दोन सुविधाव्यतिरिक्त ह्यसिटीझन सर्व्हिस सेंटरह्णच्या माध्यमातूनही पडताळणी अथवा दुरूस्ती करता येणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदार संघात आतापर्यंत एकूण ११,३८४ मतदारांची पडताळणी झाली असून, यापैकी बीएलओंमार्फत १०,६३२ मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे.मतदारांकडून ऑनलाईन झालेली पडताळणी

  • व्होटर हेल्प लाईन : ४०२
  • संकेतस्थळवरून (nvcp.in) पडताळणी : ३२२
  • सिटीझन सर्व्हिस सेंटर (सी. एस. सी.) : २०

बहुतांश माहिती योग्यचपडताळणीच्या एकूण ११,३८४ अर्जांपैकी ९६१६ मतदारांची माहिती बिनचूक आहे. उर्वरित १७६८ मतदारांच्या माहितीत दुरूस्ती करावयाची होती. त्यासाठी १६०२ अर्ज दुरूस्तीसाठी आलेले आहेत. नावात सुधारणा करण्यासाठी ४१७, वडील, पतीचे नाव बदलणे २६३, नात्यात बदल ९४, फोटो बदल ४४, वयात बदल ११६१ आणि लिंग बदल दुरूस्तीसाठी १५ अर्ज आले आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानRatnagiriरत्नागिरी