शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साखरपा : पावस (ता. रत्नागिरी) येथून मलकापूर येथे चिरे घेऊन जाणारा ट्रक संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

साखरपा : पावस (ता. रत्नागिरी) येथून मलकापूर येथे चिरे घेऊन जाणारा ट्रक संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबाघाटातील २०० फूट खोल दरीत पलटी झाला. हा अपघात रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान झाला असून, अपघातात एकजण ठार तर दोघे जखमी झाले.

देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक (एमएच ०९ बीसी ७२४१) ही चिऱ्याने भरलेली गाडी पावस ते मलकापूर अशी जात होती. आंबाघाटातील रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक २०० फूट खोल दरीत कोसळला. यामध्ये सचिन पाटील (३३) हा जागीच ठार झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले असून जखमींना आंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. हा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास झाल्याने मृतदेह व जखमींना दरीतून बाहेर काढण्यास साखरपा पोलिसांनी मोठी कसरत केली. मात्र जखमींची नावे समजू शकली नाहीत.

यावेळी देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय मारळकर व सर्व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन जखमी व मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, अंमलदार संजय मारळकर करत आहेत.