शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

शून्य पटसंख्येच्या शाळांची संख्या घटणार

By admin | Updated: July 13, 2015 00:36 IST

जिल्हा परिषद : शाळाबाह्य सर्वेक्षण मोहिमेचा फायदा ?

रत्नागिरी : इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे पालकांचा कल वाढत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना गळती लागली आहे. दरवर्षी शून्य पटसंख्येच्या शाळांमध्ये वाढ होत असलेली दिसून येत आहे. मात्र, शासनातर्फे राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण मोहिमेमुळे त्यांना शालेय प्रवाहात सामील करून घेण्यात येत आहे. या उपक्रमामुळे यावर्षी शून्य पटाच्या शाळांची संख्या कमी होणार असल्याचे आशादायी चित्र दिसू लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २७४६ प्राथमिक शाळा आहेत. २०१४-१५मध्ये शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा १६६ आहेत. ६ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा ३०८ इतक्या आहेत. ११ ते १५ पटसंख्या असलेल्या शाळा ३५९ तर १६ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा ३३७ इतक्या आहेत. ही संख्या गतवर्षीची असली तरी पटसंख्येची खरी आकडेवारी पटपडताळणीनंतर सप्टेंबरपर्यंत स्पष्ट होईल. परंतु शाळाबाह्य सर्वेक्षणामुळे मुलांना शाळेच्या प्रवाहात आणल्यामुळे कमी पटसंख्येत काही अंशी का होईना निश्चितच भर पडली आहे.शासनातर्फे शाळाबाह्य मुलांसाठी राबवण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातून ३२८ शाळाबाह्य मुले सापडली. त्यामध्ये १८६ मुलगे, तर १३२ मुलींचा समावेश आहे. मंडणगड तालुक्यात ३७, दापोली ३०, खेड १६, गुहागर ८४, चिपळूण ४२, संगमेश्वर १९, रत्नागिरी ४६, लांजा ८, राजापूर १३, रत्नागिरी शहर १३ मिळून एकूण ३३८ शाळाबाह्य मुलांची नोंदणी करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधून प्रवेश देऊन बसविणे सुरू आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांच्या एकूण पटसंख्येत ३२८ विद्यार्थ्यांची वाढ झाल्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. शून्य पटसंख्येमुळे शाळेतील शिक्षकांना समायोजित करावे लागते. त्यामुळे शिक्षकही पटसंख्या ढासळू नये, यासाठी घरोघरी जाऊन पालकांची मनधरणी करत आहेत. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यात २७४६ प्राथमिक शाळा.२०१४-१५मध्ये शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा १६६.सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातून ३२८ शाळाबाह्य.शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधून प्रवेश देण्याचे काम सुरु.