शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी उत्साही; काँग्रेस निरुत्साही

By admin | Updated: July 3, 2014 00:35 IST

दापोली मतदारसंघ : तालुकाध्यक्षांनी दिला राजीनामा

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेसने भास्कर जाधव यांचे प्रदेशाध्यक्षपद काढून कॅबिनेट मंत्रीपद दिल्यामुळे कोकणातील राष्ट्रवादीला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असून, दापोली विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दावा करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास मेहता यांनी गटतटाच्या राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला असून, काँग्रेस पक्षात निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दापोली तालुका एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. परंतु राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर काँग्रेसची वाताहत झाली. काँग्रेस पक्षातील बहुतांश कार्यकर्ते, पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल झाले. काँग्रेस पक्षाची ताकद दोन पक्षात विभागली गेल्याने काँग्रेसचा पराभव झाला. या मतदारसंघात पंचवीस वर्षांपूर्वी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला व शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत दळवी निवडून गेले.गेली २५ वर्षे या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत दळवी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारावर मात करत आहेत. तेव्हापासून काँग्रेस पक्षाला एकेकाळचा बालेकिल्ला परत मिळवता आला नाही. त्यातच काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेल्याने आता दापोली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा म्हणून राष्ट्रवादीचे पदाधिकारी वारंवार वरिष्ठांकडे मागणी करु लागले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई व जिल्हा परिषदेचे गटनेते संजय कदम यांचे रुपाने विधानसभा निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गावागावात विकासकामे पोचवली. तत्कालीन पालकमंत्री भास्कर जाधव, आताचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनचा निधी दापोली विधानसभा क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राष्ट्रवादीचे संजय कदम यांनीही खेड-मंडणगड या दोन तालुक्यांत विकासकामाचा सपाटा लावला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गावागावात विकासकामे केली जात असताना पक्षातीलच गटबाजीने काँग्रेस पक्ष रसातळाला जाऊ लागला आहे. विधानसभेची निवडणूक लढवू शकेल, असा चेहराही काँग्रेसकडे नाही. त्यामुळे दापोली मतदारसंघ राष्ट्रवादीला घेऊन त्या बदल्यात महाडची जागा काँग्रेसला सोडण्याची हालचाल वरिष्ठ पातळीवरुन दोन्ही पक्षांमध्ये सुरु असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)