Nagar Panchayat Election Results 2022 : दापोली नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत, रामदास कदमांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:06 PM2022-01-19T12:06:58+5:302022-01-19T12:11:07+5:30

माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना या निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे.

Nagar Panchayat Election Results 2022 ShivSena NCP wins in Dapoli Nagar Panchayat | Nagar Panchayat Election Results 2022 : दापोली नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत, रामदास कदमांना धक्का

Nagar Panchayat Election Results 2022 : दापोली नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत, रामदास कदमांना धक्का

googlenewsNext

दापोली : दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. १७ पैकी १४ ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीने बाजी मारत नगरपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीने ८ तर शिवसेनेने ६ जागावर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने नगरपंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्याचे या निकालावरुन दिसून आले. तर, भाजपला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. तर शिवसेना बंडखोर रामदास कदम समर्थकांना केवळ दोन जागा मिळवता आल्यात.

पालकमंत्री अनिल परब आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा या निवडणुकीत करिष्मा दिसून आला. तर माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना या निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे.

शिवसेना -राष्ट्रवादी आघाडी विजयी

एकुण जागा-१७
भाजप- १
शिवसेना-  ६
काँग्रेस- ०
राष्ट्रवादी-  ८
इतर(अपक्ष)- २

Web Title: Nagar Panchayat Election Results 2022 ShivSena NCP wins in Dapoli Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.