शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपद कळीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2015 22:49 IST

रत्नागिरी : २०१६च्या पालिका निवडणुकीत युती तुटणार!

प्रकाश वराडकर - रत्नागिरी नगरपरिषदेत चार वर्षांपूर्वी सेना - भाजप युतीची सत्ता आली. मात्र, शिवसेनेचे सर्वाधिक १३ नगरसेवक असूनही सेनेला केवळ सव्वा वर्ष नगराध्यक्षपद मिळाले. त्यानंतर नगराध्यक्षपद भाजपकडेच आहे. विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी नगराध्यक्षपद सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. नगराध्यक्षपद सोडले नाही तर पुढील निवडणुकीत युती नाही, अशी रोखठोक भूमिका सेनेकडून घेतली जात असल्यामुळे २०१६मधील पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर सेना-भाजपची युती होण्यात नगराध्यक्षपद हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. रत्नागिरी पालिकेत चार वर्षांपूर्वी शिवसेना - भाजप युतीची सत्ता आली. शिवसेनेचे १३, तर भाजपचे ८ नगरसेवक निवडून आले. युतीचे २८ पैकी २१ उमेदवार विजयी झाले. हाती आलेली सत्ता वाटून घेण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. त्यानुसार प्रत्येकी सव्वा वर्षाचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाचा कालावधी दोन वेळा घेण्याचा निर्णय झाला. प्रथम अधिक संख्याबळ असलेल्या शिवसेनेला नगराध्यक्षपदाची प्रथम संधी मिलिंद कीर यांच्या रुपाने मिळाली. त्यानंतर भाजपने पुढील दोनवेळा सव्वा वर्षाचा काळ नगराध्यक्षपद सांभाळले आहे. आता शेवटच्या सव्वा वर्षातही भाजप नगराध्यक्षपद सोडण्यास तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षात तिढा निर्माण झाला आहे. सेनेच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचला असून, त्यांनीही भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांना कल्पना दिली आहे. भाजपने पक्षपातळीवर निर्णय घेऊन शेवटचे सव्वा वर्ष सेनेला नगराध्यक्षपद दिले, तरच २०१६ मधील निवडणुकीत स्थानिक पातळीवर सेना-भाजप युती होऊ शकते, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सेनेचे खासदार विनायक राऊत, जिल्ह्यातील सेनेचे नेते राजेंद्र महाडिक, भाजप नेते बाळ माने, जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर व अन्य भाजप नेत्यांची या नगराध्यक्ष समस्येबाबत चर्चा होऊनही काही काळ उलटला आहे. नेत्यांमधील समेटाची चर्चा निष्फळ ठरल्याची चर्चाही आता जोरात आहे. पक्षनेत्यांची शिष्टाईही असफलराष्ट्रवादीला होणार लाभनगराध्यक्षपदाच्या कळीच्या मुद्द्यावरून सेना - भाजपात निर्माण झालेला वादंग मिटला नाही, तर दोन्ही पक्षांना २०१६मधील नगरपरिषद निवडणुकीत राजकीय तोटा होण्याची शक्यता अधिक आहे. चार वर्षांपूर्वी युतीचे २१ सदस्य हे एकमेकांच्या राजकीय बळावरच निवडून आल्याचे दोन्ही पक्ष मान्य करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आखाड्यात आमने - सामने आल्यास दोघांचेही नुकसान होऊन त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा फायदा होण्याची शक्यता आहे. भाजप असुरक्षितशिवसेनेचा विरोध असूनही विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्याविरोधात अविश्वास दाखल करण्याइतके संख्याबळ होत नाही. चार सदस्य अपात्र ठरल्यानंतर २४ संख्याबळानुसार अविश्वासासाठी १८ सदस्यांचीही पूर्तता सेनेकडून होऊ शकत नाही. त्यामुळेच मयेकर यांच्या नगराध्यक्षपदाला धोका नाही. मात्र, हा दोन पक्षांतील विश्वासाचा प्रश्न आहे. त्यात भाजपने विश्वासघात केला तर पुढील निवडणुकीत युती नाही, हाच निर्णय सेनेकडून घेतला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यानुसार सर्व ७ प्रभागांत निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.