शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

म्हाप्रळ, आंबेत पूल धोकादायक स्थितीत

By admin | Updated: April 6, 2015 01:31 IST

वाळू उपसा : आदेश डावलून सक्शनने उत्खनन, महसूलचे दुर्लक्ष

मंडणगड : म्हाप्रळ खाडीकिनारी सक्शनद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असून याकडे महसूलचे लक्ष नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेसुमार वाळू उपशामुळे आंबेत पूलाला धोका निर्माण होत असल्याची माहिती पुढे येत आहे. वाळू उपसा रोखण्यास महसूलला अपयश येत असल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावल्याची चर्चा सुरू आहे.
गेल्या चार वर्षात सावित्री नदी व बाणकोट खाडी परिसरात रेती लिलावाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अपवादात्मक परिस्थिीतीतच येथे हातपाटीने वाळू उपसा करण्यास परवानगी मिळाली आहे.
हातपाटीने वाळूचा उपसा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. या भागातील बंदर परिसराचा विचार करता खाडीपात्राची खोली शंभर फुटाहून खाली गेली आहे. त्यामुळे तेथे असा उपसा करता येत नाही. त्यासाठी नदी पात्रात पाईप टाकून सक्शनच्या मदतीने प्रथम बोटीत वाळू काढली जाते व नंतर किनाऱ्यालगत वाळुचे डेपो केले जातात. रेती बंदर परिसरात असे पाच डेपो सक्रीय आहेत. या डेपोवर बोटीतून सक्शनच्या मदतीने वाळू टाकली जाते व नंतर जेसीबी वा क्रेनच्या मदतीने गाडीत भरली जाते. या साऱ्या प्रक्रियेत अत्याधुनिक यंत्रसामुग्री घुसली आहे.
पूर्वी ही कामे माणसे करीत होती. त्यामुळे स्थानिक व परप्रांतीय मजुरांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत असे. सध्या यंत्रसामुग्री चालवण्यास आवश्यक असणारे मनुष्यबळच वापरावे लागते.
गेल्या काही वर्षांत न्यायालयाची प्रक्रिया व पर्यावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शासनाचे धोरण वाळू उपशाला अनुकूल राहिलेले नाही. त्याचाच परिणाम या साऱ्यावर होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सक्शन पंपाने वाळू उपशास राज्यात सर्वत्र बंदी असताना म्हाप्रळ, बाणकोट या परिसरात हा प्रकार सुरू असल्याने महसूलच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
म्हाप्रळ बंदर परिसरात विशेषत: म्हाप्रळ आंबेत पुलाचा परिसर सक्शनच्या अतिवापरामुळे ‘रेडझोन’मध्ये आला आहे़ पूल बांधणीच्या निम्म्या अंतरापर्यंत या परिसरात वाळू उपसा केला गेला असल्याने या पुलालाही धोका पोहोचू शकतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तर रायगड जिल्ह्यातील महाड, म्हसळा, गोरेगाव, श्रीवर्धन आदी तालुक्याच्या सिमा मिळतात. पाण्यातील या सिमांचा वाळूमाफिया नेहमीच चांगलाच फायदा उठवतात. सक्शनच्या विरोधात सुरू असलेली महसूलची कारवाई म्हणजे कागदी कारवाईचा केवळ अभिनय ठरत आहे़ येथील महसूल विभागाने गेल्या वर्षभरात म्हाप्रळ परिसरात सुरु असलेल्या रेती उपशाविरोधात केवळ आर्थिक दंडाची कारवाई केली आहे.
अनधिकृत वाळू उपशाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय खुला असताना केवळ दंडाची कारवाई केली जात आहे. वाळू माफियाही या प्रकाराला तयार असल्याने या कारवाईचे वर्णन केवळ उपचार इतकेच करता येत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरात वाळू माफियांचे चार गट सक्रीय होऊन वाळू उपसा करीत आहेत. बेकायदेशीर वाळू उपसा करताना वाढलेल्या स्पर्धेमुळे दर खाली येऊन सर्वसामान्याला परवडेल अशी अपेक्षा आहे, मात्र ती पूर्ण झालेली नाही असेच चित्र आहे. (प्रतिनिधी)