शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणपुढे ३६ कोटींच्या वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : वीज बिल वसुलीमध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षी लॉकडाऊनपासून थकबाकी वाढतच आहे. थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने ...

रत्नागिरी : वीज बिल वसुलीमध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षी लॉकडाऊनपासून थकबाकी वाढतच आहे. थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने महावितरणपुढे वसुलीचे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यातील एक लाख ३० हजार ४१७ ग्राहकांकडे ३६ कोटी २ लाख ५६ हजार रुपयांची थकबाकी अद्याप शिल्लक आहे.

जिल्ह्यातील एक लाख ६ हजार ५१० घरगुती ग्राहकांनी वीज बिले न भरल्यामुळे ६ कोटी ८२ लाख १५ हजार, वाणिज्यिकच्या १२ हजार ७७ ग्राहकांकडे ५ कोटी ८० लाख ७ हजार, औद्योगिकच्या ११६६ ग्राहकांकडे ३ कोटी २५ लाख ३३ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे. कृषीच्या ४३०५ ग्राहकांकडे ४२ लाख २ हजार, पथदीपच्या १३६५ ग्राहकांकडे ८ कोटी १८ लाख ८७ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ८५८ ग्राहकांकडे १ कोटी ६४ लाख ५१ हजार रुपये शिल्लक आहेत. सार्वजनिक सेवेंतर्गत २२८६ ग्राहकांकडे ९७ लाख ७२ हजार रुपये, इतर १८५० ग्राहकांकडे ८६ लाख २ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे.

चिपळूण विभागातील घरगुती २७ हजार ७५२ ग्राहकांकडे ४ कोटी ४६ लाख ९१ हजार, वाणिज्यिकच्या ३३६७ ग्राहकांकडे एक कोटी ९० लाख ६० हजार, औद्योगिकच्या ३४७ ग्राहकांकडे ९७ लाख ४७ तसेच कृषी, पथदीप, सार्वजनिक सेवा, पाणीपुरवठा विभाग व इतर मिळून एकूण ३३ हजार ६५९ ग्राहकांकडे ९ कोटी ८२ लाख १२ हजार रूपयांची थकबाकी शिल्लक आहे.

खेड विभागातील ३० हजार ४५ घरगुती ग्राहकांकडे ३ कोटी ५८ हजार ९६, वाणिज्यिकच्या २९६८ ग्राहकांकडे १ कोटी २४ लाख ८ हजार, औद्योगिकच्या २९६ ग्राहकांकडे ६६ लाख १२ हजार तसेच अन्य सर्व ग्राहक मिळून एकत्रित ३५ हजार ९१७ ग्राहकांकडे ९ कोटी ११ लाख ५६ हजार रूपयांची थकबाकी शिल्लक आहे.

रत्नागिरी विभागातील ४८ हजार ७१३ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ८२ लाख १५ हजार, वाणिज्यिकच्या ५७४२ ग्राहकांकडे २ कोटी ६५ लाख ३९ हजार, औद्योगिकच्या ५२३ ग्राहकांकडे एक कोटी ६१ लाख ७४ हजार तसेच अन्य सर्व ग्राहकांची मिळून एकूण ६० हजार ८४१ ग्राहकांकडे १७ कोटी ८ लाख ८९ हजार रुपयांची थकबाकी आहे.

.................................

कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे वसुलीसाठी पथक बाहेर पडणे अशक्य आहे. ग्राहकांनी स्वत:च वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. घराबाहेर पडणे अशक्य असल्याने ऑनलाईन किंवा मोबाईल अ‍ॅपचा वापर ग्राहकांनी करावा.

- देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.