लांजात आणखी चाैघे पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:28 IST2021-04-03T04:28:54+5:302021-04-03T04:28:54+5:30

लांजा : तालुक्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी निवसर, कोंड्ये, कोर्ले येथील एकूण चार ...

More positive in Lanjat | लांजात आणखी चाैघे पाॅझिटिव्ह

लांजात आणखी चाैघे पाॅझिटिव्ह

लांजा : तालुक्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी निवसर, कोंड्ये, कोर्ले येथील एकूण चार जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५७६ झाली आहे.

निवसर येथे आढळून आलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ६० वर्षीय प्रौढ महिला, कोंड्ये बौद्धवाडी येथील ६३ वर्षीय प्रौढ पुरुष, कोर्ले पिंपलवाडी येथे आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १९ वर्षीय युवती तसेच ४० वर्षीय महिला असे एकूण चार जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात असलेल्या ५७६ कोरोना रुग्णांपैकी ५३३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, १५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या तालुक्यात एकूण २८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

Web Title: More positive in Lanjat