शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टर उपक्रमांतर्गत जिल्ह्यात दुग्धवाढ

By admin | Updated: June 28, 2016 00:34 IST

पशुसंवर्धन विभाग : शेतकऱ्यांना सधन बनविण्यासाठी प्रयत्न

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती करण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग क्लस्टर उपक्रमांतर्गत दुग्धोत्पादन वाढीसाठी प्रयत्नशीर आहे. आज जिल्ह्यात प्रतिदिन २ लाख ५५ हजार ३४२ लिटर्स दुग्धोत्पादन करण्यात येत आहे. क्लस्टर उपक्रमांतर्गत प्रतिदिन ३८९० लिटर्स दुग्धोत्पादन होत असून, दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १,६१,५०६९ असून, त्यांच्यासाठी प्रतिदिन ४ लाख ३६ हजार ६८ लिटर्स दुधाची आवश्यकता असताना आज जिल्ह्यात केवळ प्रतिदिन २ लाख ५५ हजार ३४२ लिटर्स दुग्धोत्पादन केले जाते. जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी असतानाही दुधाचे उत्पादन फार कमी प्रमाणात आहे. त्यामुळे कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातून विविध कंपन्यांच्या पावणेदोन लाख लिटर्स दुधाची विक्री होत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळाल्यास दुग्ध व्यवसायातून अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबल होऊ शकतात. त्यासाठी जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय वाढीसाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात २९ हजार १३३ दुग्धोत्पादक शेतकरी असून, २२२ नोंदणीकृत सहकारी दुग्धोत्पादक संस्था आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात ५२ दुग्धसंस्था कार्यान्वित असल्या तरी केवळ ४२ संस्था शासनाकडे दूध जमा करतात. संगमेश्वर तालुक्यात २१ आणि लांजा तालुक्यामध्ये ७ अशा एकूण २८ दुग्ध संस्था आहेत. या दोन्ही तालुक्यांमधील संस्थांचे सुमारे १५०० लाभार्थी सभासद आहेत. मात्र, या दुग्ध संस्थांकडून किरकोळ प्रमाणात दूध संकलन केले जात असून, ते सभासद असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी खूपच कमी आहे. या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहेत. यासाठी जिल्ह्यात क्लस्टर उपक्रम राबविण्यात येत असून, त्यातून प्रत्येक तालुक्यात १० हजार लिटर्स दूध उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक बाजारपेठही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे येथील जनतेला जिल्ह्यातूनच दूध मिळणार आहे. या दूधाची विक्री मोठ्या शहरांमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी ब्रँडही तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)प्रोत्साहन : चाऱ्यापासून मशीनपर्यंतदुधाळ जनावरांसाठी मुबलक हिरव्या वैरणीकरिता मका बियाणे व बहुवर्षीय चाऱ्याचे ठोंब वाटप करण्यात येणार आहेत. तसेच हायड्रोफोनिक्सद्वारे सकस वैरण उत्पादनाकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. अ‍ॅटोमेटिक मिल्कींग मशीनचाही वापर करण्यात येणार आहे.