शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाच्या चौकशीत वैद्यकीय अधिकारी दोषी

By admin | Updated: August 7, 2015 23:35 IST

खंडाळा आरोग्य केंद्र : लवकरच निलंबनाचा प्रस्ताव

रत्नागिरी : खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पाटील यांनी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचे चौकशीअंती सिध्द झाले आहे. डॉ. पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव लवकरच आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील हे मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असताना त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. ते मद्य प्राशन करून ड्युटीवर येत असल्याने त्यांची अन्य ठिकाणी बदली करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे केली होती. सध्या खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. पाटील सेवा बजावत होते. डॉ. पाटील यांनी विनयभंग केल्याची तक्रार या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेने पोलीस स्थानकात केली होती. त्याचवेळी डॉ. पाटील यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी तेथील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनही केले होते. त्यानंतर पोलिसांनी डॉ. पाटील याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही केली होती. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत डॉ. पाटील यांनी केलेल्या कृत्याबद्दल सभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. डॉ. पाटील यांच्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय आरोग्य समितीत घेण्यात आला. डॉ. पाटील यांचा आरोग्य सभापती डॉ. अनिल शिगवण यांच्यासह सदस्यांनी निषेध केला होता. त्याचवेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. पाटील यांची डॉ. ठोंबरे यांनी चौकशी केली. या चौकशी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेतले. त्यामध्ये डॉ. पाटील यांनी विनयभंग केल्याचे चौकशीमध्ये पुढे आले. ते दोषी असल्याचे सिध्द झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाईचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने कार्यवाही सुरु केली असल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले. चिपळूण तालुक्यातील रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराम घोगरे आणि फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश सोनवणे यांच्याबद्दल असलेल्या तक्रारीवरुन त्यांचीही चौकशी अजून सुरु आहे. (शहर वार्ताहर) आरोग्य विभागाला अहवाल प्राप्तडॉ. पाटील यांच्या खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दारुच्या पार्ट्या चालत असल्याने तेथील हैराण झाले होते. तेथील दोन कर्मचारीही या पार्ट्यांमध्ये सहभागी होत असल्याचे पुढे आले होते. विनयभंग प्रकरणानंतर दारु प्रकरण पुढे आले. त्यामुळे त्या दोन कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्याच्या सूचना सभापती डॉ. शिगवण यांनी दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने त्यांची धावपळ उडाली आहे.