शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मार्गताम्हाणे एमआयडीसीचे क्षेत्र कमी होणार

By admin | Updated: July 2, 2014 00:09 IST

मंत्रालय बैठकीत अनेक निर्णय : प्रदूषणकारी कारखाने येणार नाहीत : अहिर

रत्नागिरी : गुहागर आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमेवरील १४ गावांच्या क्षेत्रात नियोजित मार्गताम्हाणे एमआयडीसीमध्ये प्रदूषणकारी कारखाने येणार नाहीत. यासाठी ‘नो हॅझार्डस’ व ‘नो केमिकल झोन’ जाहीर करण्याची हमी घेऊन अधिसूचनेमध्येही तसे नमूद करण्यात येईल, असे ठोस आश्वासन उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिले. एमआयडीसीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन संपादित होणार असेल, तर आपण स्वत: विरोध करू, असे कामगारमंत्री जाधव यांनी स्पष्ट केल्यानंतर सचिन अहिर यांनी क्षेत्र कमी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नियोजित मार्गताम्हाणे एमआयडीसीला होत असलेल्या विरोधाबाबत प्रकल्पबाधित शेतकरी व संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत भास्कर जाधव यांच्या दालनात झाली. यावेळी सचिन अहिर यांच्यासह एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, प्रादेशिक अधिकारी प्रकाश पाटील, एमआयडीसी भूसंपादन विभागाच्या महाव्यवस्थापक वैदेही रानडे, भूसंपादन अधिकारी एस. एन. पालशेतकर, उपविभागीय अधिकारी देवेंद्र अंधारे आणि प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते.एमआयडीसीच्या संपादित क्षेत्राबाबत या बैठकीत चर्चा झाली. एमआयडीसीसाठी ३५०० हेक्टर जमिनीची आवश्यकता असून त्यात तडजोड होणार नाही, असे गगराणी सांगत असताना जाधव यांनी हस्तक्षेप केला. तेव्हा अहिर यांनी जाधव यांच्या सूचनेनुसार क्षेत्र कमी करण्याचे निर्देश दिले. पाथर्डी, मुंढर, चिखली, गिमवी ही गावे भौगोलिक परिस्थितीमुळे वगळणे योग्य असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले. प्रकल्पग्रस्तांना प्रचलित बाजारभाव, रेडीरेकनरचे दर, मागील तीन वर्षांचे खरेदी - विक्री व्यवहार तपासून भूसंपादन कायद्यानुसार मोबदला रक्कम पूर्वीपेक्षा दुप्पट मिळेल. शिवाय १५ टक्के प्लॉट प्रकल्पग्रस्तांना देय आहेत, असेही गगराणी म्हणाले. सात-बारा उताऱ्यावर शेरा मारल्यामुळे जमीनमालकांचे व्यवहार ठप्प आहेत. मात्र अधिग्रहण सुरू होताच उर्वरित जमिनींवरील शेरे काढून घेण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. (प्रतिनिधी)