आंबा, काजूला नुकसानभरपाई हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:28 IST2021-04-14T04:28:45+5:302021-04-14T04:28:45+5:30

राजापूर : अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, तसेच कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला योग्य किंमत ...

Mango, cashew need compensation | आंबा, काजूला नुकसानभरपाई हवी

आंबा, काजूला नुकसानभरपाई हवी

राजापूर : अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, तसेच कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला योग्य किंमत मिळावी, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

कोकण विभाग खरीप हंगाम नियोजन पूर्व तयारी आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे कोकण दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील रत्नागिरी कृषी विभागातर्फे आयोजित 'विकेल ते पिकेल' या अभियानांतर्गत उभारलेल्या कलिंगड विकी स्टॉलला भेट दिली. त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये आमदार साळवी यांनी कोकणाचे काही प्रश्न मांडले. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू बागायतदाराचे झालेले नुकसान तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करणे व कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला कमीत कमी १५० ते १६० रुपये दर मिळण्याची मागणी आमदार साळवी यांनी केली.

यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त संचालक डॉ. शिंदे, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, प्रभारी उपविभागीय अधिकारी बनसोडे, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मंचेकर, राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे, राजापूर गटविकास अधिकारी पाटील, राजापूर तालुका कृषी अधिकारी विद्या पाटील, राजापूर सभापती प्रमिला कानडे, लांजा सभापती मानसी आंबेकर उपस्थित होते.

Web Title: Mango, cashew need compensation