शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड नगरपंचायत निवडणूक १ नोव्हेंबरला

By admin | Updated: September 28, 2015 23:52 IST

कार्यक्रम जाहीर : १० ग्रामपंचायतींची २८ आॅक्टोबरला मतदान

रत्नागिरी : मंडणगड येथील नवनिर्मित नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल दीर्घ प्रतीक्षेनंतर एकदाचे वाजले आहेत. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यासाठी २८ आॅक्टोबरला मतदान होणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त स. द. सहारिया यांनी सोमवारी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यातील नऊ पैकी आठ तालुक्यांमधील मुख्य ठिकाणी नगरपरिषद किंवा नगरपंचायत आहे. केवळ मंडणगडमध्येच ग्रामपंचायत अस्तित्वात होती. काही महिन्यांपूर्वी मंडणगड नगरपंचायतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली. तर भाजपने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिकाही जाहीर केली. त्यामुळे ही निवडणूक कधी होणार, ही उत्सुकता मंडणगडवासीयांना लागून राहिली होती. अखेर सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त स. द. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख जाहीर केली. त्यामुळे येत्या १ नोव्हेंबरला या नगरपंचायतीसाठी मतदान होणार असून, २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.आठ जिल्ह्यांतील एकूण १८९ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आला असून, त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी येत्या २८ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. (प्रतिनिधी)