शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड पक्षातून निलंबित; कारवाईवर लाड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

By अरुण आडिवरेकर | Updated: November 11, 2024 18:18 IST

राज्यातील २८ नेत्यांवर कारवाई 

रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघात पक्षादेश डावलून बंडखाेरी करणाऱ्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशानुसार व प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील २८ नेत्यांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे.काँग्रेसने महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघातील तिकीट वाटप केले आहे. तथापि, काही पदाधिकाऱ्यांनी घटक पक्षांच्या उमेदवारांविरोधात अर्ज भरत पक्षविरोधी भूमिका घेतली आहे.या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार बंडखोर पदाधिकाऱ्यांविरोधात पक्षशिस्त भंगाची कारवाई करून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी सोशल मीडियावर अधिकृतपणे परिपत्रकाद्वारे दिली आहे.

कारवाईची चिंता नाहीनिवडणूक असल्यावर ताे एक पक्षाचा भाग असताे. आघाडीचा धर्म पाळावा लागताे. आमची लढाई काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी हाेती. पक्षाकडून मला तिकीट मिळावे, अशी मला अपेक्षा हाेती. मला कारवाईची चिंता नसून माझी भूमिका पक्षाला पटवून देईन, असे अविनाश लाड यांनी पक्षाच्या कारवाईनंतर प्रसार माध्यमांशी बाेलताना सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४rajapur-acराजापूरcongressकाँग्रेसthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024