शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
2
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
3
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
4
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
5
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
6
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
7
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
8
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
9
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
10
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
11
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
12
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
13
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
14
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
15
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
16
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
17
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
18
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
19
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
20
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election Voting: चार यंत्रे बिघडली; रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ६८.१४ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:07 IST

सर्वाधिक गुहागरात ७५.२६ तर रत्नागिरीत सर्वात कमी ५५.०९ टक्के

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०० मतदान केंद्रांवर सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सरासरी ६८.१४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ५१ हजार २२७ महिलांनी आणि ४९ हजार १९८ पुरुषांनी तसेच अन्य एका मतदाराने अशा एकूण १ लाख ४२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान गुहागरमध्ये ७५.२६ टक्के तर सर्वात कमी मतदान रत्नागिरीत ५५.०९ टक्के झाले.जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, खेड आणि चिपळूण या चार नगरपरिषद आणि गुहागर, देवरुख आणि लांजा या नगरपंचायतीसाठी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठांमध्येही मतदानाचा उत्साह दिसून येत होता. सुरुवातीपासून मतदानाला चांगला प्रतिसाद होता. जिल्ह्यात सकाळी ९:३० वाजेपर्यंत १४.२६ टक्के मतदान झाले. ११:३० वाजता ३०.८९ टक्के, दुपारी १:३० वाजता ४६.६४ टक्के, ३:३० वाजता ५८.३१ आणि शेवटच्या टप्प्यात सायंकाळी ५:३० वाजता ६४.१४ टक्के अंतिम मतदान झाले.या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ४५७ मतदारांची नोंद झाली होती. ७७ हजार ८८५ पुरुष आणि ८२ हजार ५६२ महिला मतदारांचा यात समावेश होता. यापैकी मंगळवारी ५१ हजार २२७ महिलांनी आणि ४९ हजार १९८ पुरुषांनी तसेच अन्य एका मतदाराने अशा एकूण १ लाख ४२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत जिल्ह्यात सरासरी ६८.१४ टक्के अंतिम मतदान झाले.

पालिका मतदानाची टक्केवारी

  • रत्नागिरी ५५.०९
  • चिपळूण ६४.१५
  • खेड ६२.५३
  • राजापूर ७४.५५
  • लांजा ७१.०६
  • देवरुख ७४.३३
  • गुहागर ७५.२६

चार यंत्रे बिघडलीया प्रक्रियेदरम्यान रत्नागिरी आणि लांजा या ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार घडला. ही मतदान यंत्रे तत्काळ बदलून पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. रत्नागिरीत प्रभाग ३ व प्रभाग १४ मधील मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला हाेता. ही यंत्रे तत्काळ बदलण्यात आली. लांजात प्रभाग ९ मधील मतदान यंत्र बंद पडल्याचा प्रकार घडला हाेता. या ठिकाणी नवीन मतदान यंत्र देण्यात आले. तसेच प्रभाग १७ मध्ये मतदानापूर्वी यंत्राची तपासणी करताना ते नादुरुस्त असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या ठिकाणी नवीन मतदान यंत्र देण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Local Elections: 68.14% Voter Turnout; Four Machines Malfunctioned

Web Summary : Ratnagiri district saw a 68.14% average voter turnout for local body elections. Guhagar recorded the highest turnout at 75.26%, while Ratnagiri had the lowest at 55.09%. Four voting machines malfunctioned in Ratnagiri and Lanja, but were quickly replaced ensuring voting resumed promptly.