शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे ट्रॅकला भाविकांचा भार

By admin | Updated: September 16, 2015 00:48 IST

प्रवाशांची गैरसोय : संथ झालेल्या गाड्यांमुळे भाविकांचे हाल

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी मुंबईकरांची संख्या वाढली आहे. मुंबईकरांसाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या. परंतु, या गाड्या गेले दोन दिवस अर्धा ते पाच, सहा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. अवघ्या कोकणवासीयांचा गणेशोत्सव हा लाडका सण आहे. या काळात असंख्य भाविक मिळेल त्या वाहनाने कोकणात येत असतात. यावर्षी कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या फुल्ल झाल्या. शिवाय एस. टी. बसेस, खासगी गाड्यांचीही संख्या मोठी आहे. कोकण रेल्वेला गणेशभक्तांची अधिक पसंती असल्याने कोकण रेल्वे महामंडळाने विशेष गाड्या सोडल्या आहेत. सीएसटी - मडगाव गणपती स्पेशल ही गाडी दीड तास उशिरा धावत आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस ४० मिनिटे उशिराने धावत आहे. दादर- सावंतवाडी एक्स्प्रेस २५ मिनिटे उशिरा धावत आहे. गरीबरथ २ तास उशिराने धावत आहे. मंगला एक्स्प्रेस १ तास ५० मिनिटे उशिरा धावत आहे. मत्स्यगंधा १ तास २० मिनिटे उशिरा धावत आहे. भावनगर कोचिवली २ तास १५ मिनिटे उशिरा धावत आहे. मडगाव - सावंतवाडी पॅसेंजर १ तास २० मिनिटे उशिरा धावत आहे. सावंतवाडी - दादर गणपती स्पेशल २ तास उशिरा, तर मंगलोर - सीएसटी ६ तास उशिरा धावत आहे. रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्याने चिपळूण रेल्वे स्टेशनवर असलेल्या प्रवाशांचे, लहान मुलांचे हाल झाले आहेत. त्यांना प्यायला पाणी किंवा खायला अन्न मिळणे अवघड झाले होते. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. (प्रतिनिधी)