राेटरी क्लबतर्फे तळवटपाल शाळेला एलईडी संच भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:52+5:302021-07-02T04:21:52+5:30

अडरे : चिपळूण येथील रोटरी क्लबतर्फे खेड तालुक्यातील तळवटपाल शाळेला एलईडी संच भेट देण्यात आला. तळवटपाल शाळेच्या मुख्याध्यापिका मिनोती ...

LED set gift to Talwatpal School by Night Club | राेटरी क्लबतर्फे तळवटपाल शाळेला एलईडी संच भेट

राेटरी क्लबतर्फे तळवटपाल शाळेला एलईडी संच भेट

अडरे : चिपळूण येथील रोटरी क्लबतर्फे खेड तालुक्यातील तळवटपाल शाळेला एलईडी संच भेट देण्यात आला.

तळवटपाल शाळेच्या मुख्याध्यापिका मिनोती जाधव यांनी शाळेला एलईडी संच देण्याची मागणी केली हाेती. त्याला चिपळूण येथील रोटरी क्लबने सकारात्मक प्रतिसाद देत हा संच भेट दिला. याबद्दल योगेश आडे, बालाजी बोबले यांनी रोटरी क्लबचे आभार मानले. यावेळी रोटरी क्लबचे प्रशांत देवळेकर, सचिव बाळा आंबुर्ले, खजिनदार मनोज जैन, वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, प्रसाद सागवेकर, विनोद घुमरे, दत्तप्रसाद बापट, नितीन देवळेकर, मंगेश गोंधळेकर, आदी उपस्थित होते.

-------------------------

चिपळूण येथील राेटरी क्लबतर्फे खेड तालुक्यातील तळवटपाल शाळेला एलईडी संच भेट देण्यात आला.

Web Title: LED set gift to Talwatpal School by Night Club