शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बोरज येथील पऱ्यात रसायन सोडले

By admin | Updated: July 11, 2014 00:17 IST

ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांमुळे ही बाब उघड

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज पाखाडीचा पऱ्या येथे रसायन वाहून नेणाऱ्या एका टँकरमधून रसायन सोडण्याचे काम खुलेआमपणे सुरु होते. ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांमुळे ही बाब उघड झाली. पाखाडीचा पऱ्या या ठिकाणी रंग तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोडून देण्यात येत होते. संबंधित टँकरचा चालक पाखाडीचा पऱ्या येथे टँकर उभा करुन पाईपद्वारे टँकरमधील रसायन सोडत होता. यावेळी हे कोणते रसायन आहे, काय आहे, याबाबत विचारता पोलिसांनी या रसायनाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, या टँकरच्या चालकाला ताब्यात घेतले आहे असे सांगितले.लोटे औद्योगिक वसाहत ही रासायनिक कारखाने असलेली वसाहत आहे. दाभोळ खाडीत घातक रसायनामुळे मासे मेल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. पावसाळ्याच्या दरम्यान ही घटना घडली असताना हे घातक रसायन पाखाडीच्या पऱ्याच्या खालील बाजूस असलेल्या शेतीलादेखील घातक ठरणार आहे. नजीकच असलेल्या बोरज धरण परिसरातील पाण्यातदेखील हे रसायन मिसळण्याचा धोका आहे. मात्र, हे रसायन सोडणाऱ्या चालकाला टँकरसह पकडण्यात आल्यामुळे चौकशी सुरु आहे. याप्रकरणी संबंधित वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर, नाना चाळके, पुष्पेंद्र दिवटे, पोलीसपाटील प्रथमेश घोसाळकर, सतीश शिंदे, अशोक शिंदे, संजय चिनकटे, उदय घोसाळकर, दिलीप घोसाळकर, सुरेश मोरे, राजेंद्र घोसाळकर यांच्यासह ग्रामस्थ व मनसेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. बोरज येथील पाखाडीचा पऱ्या येथे ता.२६ डिसेंबर २००९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास असेच रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लगतच असलेल्या बोरज धरणातील पाणी दूषित झाले होते. मोठ्या प्रमाणात पाण्यातील जलचर मृत्यूमुखी पडले होते. परंतु यावेळी देखील अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकाराची आज पुनरावृत्ती झाली असती. परंतु ग्रामस्थ व मनसेचे कार्यकर्ते यांच्यामुळे हा प्रकार टळला असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली होती. (प्रतिनिधी)