दापाेलीतील भूमी अभिलेख कार्यालयाची वीज ताेडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST2021-08-27T04:34:41+5:302021-08-27T04:34:41+5:30

दापोली : वीज बिल न भरल्याने दापाेलीतील भूमी अभिलेख कार्यालयाची वीज ताेडण्यात आली. त्यामुळे कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले ...

The land records office in Dapali was electrocuted | दापाेलीतील भूमी अभिलेख कार्यालयाची वीज ताेडली

दापाेलीतील भूमी अभिलेख कार्यालयाची वीज ताेडली

दापोली : वीज बिल न भरल्याने दापाेलीतील भूमी अभिलेख कार्यालयाची वीज ताेडण्यात आली. त्यामुळे कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, नागरिकांना गैरसाेयीला सामाेरे जावे लागत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, काहीही बोलण्यास नकार दिला.

दापोली भूमी अभिलेख कार्यालयाकडून गेले चार महिन्यांचे बिल भरण्यात आले नव्हते. आज अचानक वीज वितरण कंपनीचे कर्मचारी येऊन वीज कनेक्शन तोडून गेले. त्यानंतर मात्र या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना जाग आली. ‘आम्ही बिल भरतो, परंतु वीज कनेक्शन तोडू नका’ अशी विनंती कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. परंतु, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज ताेडण्यावर ठाम राहिले. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अंधार पसरला होता. वीज नसल्याने कार्यालयातील काेणतीचे कामे हाेऊ शकलेली नाहीत.

Web Title: The land records office in Dapali was electrocuted