शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खेरवसेत वादळी वार्‍याने केळीची बाग जमीनदोस्त

By admin | Updated: June 5, 2014 00:46 IST

शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लांजा : तालुक्यातील खेरवसे येथील प्रभात अ‍ॅग्रोटेक शेती फार्ममध्ये लावण्यात आलेल्या केळीच्या बागेमध्ये वादळी वार्‍याने थैमान घातल्याने केळीची अनेक झाडे भुईसपाट झाली. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी ११ वाजता सोसाट्याच्या वार्‍याने अनेक ठिकाणी पडझड झाली असतानाच कुर्णे मानेवाडी येथे विद्युतभारीत वाहिन्यांवर आंब्याच्या झाडाची फांदी पडल्याने सर्व वाहिन्या तुटून खाली पडल्या होत्या. तसेच कुर्णे - बौद्धवाडी येथे खैराचे झाड पोलवर पडल्याने दोन पोल जमीनदोस्त झाले आहेत, तर तीन ते चार पोल वाकले आहेत. या ठिकाणी पोल पडल्याची माहिती तत्काळ दिल्यानंतरही महावितरण कंपनीचे कर्मचारी बुधवारी सायंकाळपर्यंत पोहोचले नव्हते. येथील जनतेला दुसर्‍या दिवशीही काळोखात रात्र काढावी लागली. वादळी वार्‍याचा सर्वाधिक फटका महावितरण कंपनीला बसला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत लाईन तुटल्याने महावितरण कंपनीचे कर्मचारी अहोरात्र या कामामध्ये गुंतले आहेत. तालुक्यातील खेरवसे येथे प्रभात अ‍ॅग्रोटेक शेती फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली आहे. मंगळवारी आलेल्या सोसाट्याच्या वादळाने अर्धी बाग जमीनदोस्त केल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या या वादळी वार्‍यामुळे ठिकठिकाणी नुकसान झाले असून पंचनाम्याचे काम सध्या सुरू आहे. तालुक्याच्या अन्य भागात मात्र कोठेही वित्तहानीचे वृत्त नाही. खेरवसे तसेच पंचक्रोशीतील काही गावांनाच या वादळाचा मोठ्या प्रमाणावर तडाखा बसल्याचे तहसिलदार कार्यालयातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी) मिरकरवाडा जेटीवर जबरदस्त राडा डोके फोडले रत्नागिरी : मिरकरवाडा जेटीवर मासे आणण्यासाठी जाणार्‍याची दुचाकी अडवून तुझे चुलते दादागिरी करतात काय, तू दादा झालास काय, अशी विचारणा करीत एकाने शिविगाळ करीत हाताच्या थापटाने मारहाण केली, तर त्याच्या साथीदाराने पाठीमागून लोखंडी पाईपने डोक्यावर मारले. याबाबत विशाल विजय पिलणकर (२६, मुरुगवाडा, रत्नागिरी) यानी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशाल पिलणकर हा आपल्या ताब्यातील अ‍ॅक्टिव्हा (एमएच-०८-एसी २३३०) वरून आज (बुधवार) सकाळी ९ वाजता मिकरवाडा जेटीवर आला असता त्याची गाडी लिलाधर दत्ताराम नागवेकर व सनी सिंहबघेल या दोघांनी अडविली. त्यानंतर पिलणकर याला नागवेकर यांनी शिविगाळ करीत मारहाण सुरू केली. दादागिरी करतोस काय, असे म्हणत मारहाण सुरू असताना त्याच्याबरोबर असलेल्या सनी याने विशालच्या डोक्यावर लोखंडी पाईपने प्रहार केला. त्यात विशाल जखमी झाला आहे. दोन्ही आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)